स्पेशल

महाराष्ट्रात आहे देशातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच धबधबा! पावसाळ्यामध्ये ‘या’ धबधब्याला भेट द्या आणि निसर्गाचा आनंद घ्या

Published by
Ajay Patil

महाराष्ट्राला निसर्गाने खूप काही भरभरून असे दिले आहे. अगदी चांद्यापासून तर बांद्यापर्यंत महाराष्ट्र पाहिला तर निसर्गाने समृद्ध असून सह्याद्रीच्या डोंगर रांगा व उत्तरेला असलेला सातपुडा पर्वताची रांग यामुळे महाराष्ट्राचे रूपड आणखीनच खुलून दिसते.

त्यामध्ये जर आपण सह्याद्री पर्वतरांगांचा विचार केला तर महाराष्ट्रातील बहुसंख्य पर्यटन स्थळे या सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले आहेत. खासकरून पावसाळ्यामध्ये या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांना पर्यटकांची भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होत असते.

म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील बरेच जिल्ह्यांमध्ये अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळे असून या ठिकाणी पर्यटकांची दरवर्षी मोठी गर्दी होत असते. तसेच मोठ्या प्रमाणावर गड किल्ल्यांची देखील संख्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये जास्त आहे.

अगदी या दृष्टिकोनातून जर आपण सातारा जिल्ह्यात असलेल्या ठोसेघर धबधब्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हा एक महत्त्वाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच व देशातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच धबधबा असून या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची खूप मोठी गर्दी होत असते.

त्यामुळे तुम्हाला देखील यावर्षी पावसाळ्यामध्ये धबधबा पाहायची इच्छा असेल तर तुम्ही ठोसेघर धबधबा येथे  जाऊन तुमचा आनंद द्विगुणित करू शकता.

 ठोसेघर धबधबा आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा

सातारा जिल्हामध्ये असलेला व नयनरम्य असा निसर्गाच्या कुशीत लपलेला ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यामध्ये पर्यटकांचे खूप मोठी गर्दी होत असते. या धबधब्याचे जर आपण महत्त्वाचे वैशिष्ट्य पाहिले तर हा महाराष्ट्रातील सर्वात उंच तर भारतातील उंच धबधब्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वपूर्ण धबधबा आहे.

ठोसेघर धबधबा हा सातारा जिल्ह्यामध्ये असून तारळी नदीवर आहे. जर आपण पश्चिम घाटात असलेल्या विविध निसर्ग सौंदर्य पाहिले तर त्यामध्ये ठोसेघर धबधब्याचे नाव आवर्जून घ्यावे लागते. हा धबधबा साधारणपणे 150 ते 180 मीटर उंचीवरून वाहतो. जर तुम्हाला देखील हा धबधबा पाहायचा असेल तर तुम्ही साताऱ्याला जाऊन त्या ठिकाणहून हा धबधबा पाहण्यासाठी जाऊ शकतात.

सातारा शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर ठोसेघर हे गाव आहे व या गावातच हा धबधबा आहे. एकंदरीतपणे ठोसेघर या गावाच्या नावावरूनच या धबधब्याला ठोसेघर हे नाव पडले आहे.तसेच या ठिकाणी जाण्याच्या अनेक सोयी उपलब्ध आहेत. तुम्ही सातारा रेल्वे स्टेशन किंवा सातारा बस स्थानकातून देखील हा धबधबा पाहण्यासाठी जाऊ शकतात.कारण या ठिकाणी जाण्यासाठी बसच्या सोयी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्राच्या मुकुट असलेल्या सह्याद्रीच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर घालण्याचे महत्त्वपूर्ण काम ठोसेघर धबधबा करतो. या धबधब्याचे एकूण तीन मुख्य प्रवाह आहेत. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पर्यटक येत असतात

व त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेकरिता गॅलरींचे बांधकाम करण्यात आलेले आहे व जाळ्या देखील लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात तुम्हाला देखील निसर्गाचे सौंदर्य व त्यासोबत एखादा धबधबा पहायची इच्छा असेल तर तुम्ही ठोसेघर धबधब्याला भेट देऊ शकतात व त्यासोबत सह्याद्रीचे अनोखे नैसर्गिक सौंदर्य देखील अनुभवू शकतात.

Ajay Patil