अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज 4 डिसेंबर (शनिवार) रोजी होणार आहे. 15 दिवसांच्या काळात हे दुसरे ग्रहण आहे. यापुर्वी १९ नोव्हेंबर रोजी चंद्रग्रहण झाले होते.
भारतामधून हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याने येथील नागरिकांना या अवकाशीय खगोलीय घटनेचा अनुभव घेण्यासाठी युट्युब वर लाईव्ह स्ट्रिमिंग पहावं लागणार आहे.
आज नासाच्या अधिकृत युट्युब चॅनेलवरून सूर्यग्रहण पाहण्याची सोय करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार आजचं सूर्यग्रहण दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि पृथ्वीवर त्याच्या सावलीचा सर्वात गडद भाग पडतो तेव्हा हे संपूर्ण सूर्यग्रहण होते.
सूर्यग्रहणाची (वेळ सकाळी 10:59 पासून सुरू होईल आणि दुपारी 3:07 पर्यंत राहील. अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे.
सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. 01 वाजून 57 मिनटांनी हा ग्रहण पूर्ण चंद्रमाच्या छायेत राहणार आहे. यामुळे दिवस असूनही यावेळी आंधार राहणार आहे.