Tourist In Himachal:- जेव्हा कोणीही पर्यटनाची म्हणजेच कुठे बाहेर फिरायला जायची प्लॅनिंग करतात तेव्हा सगळ्यात अगोदर आपण आपला बजेट पाहत असतो. आपण एक, दोन किंवा जितके दिवस बाहेर फिरायला जाऊ तितक्या दिवस आपल्याला राहणे आणि खाणे यावर सगळ्यात जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे आपल्या बजेटमध्ये तो आपल्याला परवडेल अशाच ठिकाणी जाण्याचा आपण प्लॅन करत असतो.
कारण पैशांचा बजेट खूप महत्त्वाचा असतो व प्रत्येकाकडे नेमके किती पैसे आहेत यानुसार आपण सगळ्या प्लॅनिंग करत असतो. परंतु भारतामध्ये अशी काही ठिकाणी आहेत की जिकडे तुम्ही फिरायला गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी राहण्याची व खाण्याची मोफत सुविधा दिली जाते.
फक्त ती आपल्याला माहीत असणे तितकेच गरजेचे आहे. अगदी याच प्रमाणे तुम्हाला देखील हिमाचल आणि ऋषिकेश यासारख्या ठिकाणी भेट द्यायची असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला राहणे आणि खाणे मोफत मिळवू शकतात.
ऋषिकेश आणि हिमाचलला या ठिकाणी मिळेल तुम्हाला राहणे आणि खाण्याची फ्री सुविधा
1- ऋषिकेश– भारतातील अध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि निसर्गसौंदर्य अनुभवाचे असेल तर हरिद्वार आणि ऋषिकेश हे ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर तुमचा देखील ऋषिकेशला जायचा प्लॅनिंग असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात व फ्री मध्ये राहणे व खाण्याचे सुविधा मिळू शकतात. जेव्हा तुम्ही ऋषिकेश मध्ये जाल तेव्हा परमार्थ निकेतन मध्ये तुम्ही राहू शकतात व त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही पैसे द्यावे लागत नाहीत.
फक्त नियम एवढाच आहे की तुम्हाला त्या ठिकाणी काही सेवा कार्य करणे गरजेचे असते. याशिवाय भारत हेरिटेज सर्विसेस ऋषिकेशमध्ये असून येथे देखील तुम्ही मोफत राहू शकतात आणि जेवणाची व्यवस्था देखील तुमची केली जाते. या ठिकाणी देखील आलेल्या प्रवाशांना किंवा भक्तांना मोफत सेवा मिळते फक्त तुम्हाला स्वयंसेवक म्हणून थोडे काम त्या ठिकाणी करावे लागते.
या ठिकाणी तुम्ही जर मुक्काम केला तर तुम्हाला अनेक मंदिरांना भेटी देता येऊ शकतात आणि गंगेच्या काठावर तुम्हाला काही क्षण घालवून निरव शांतता अनुभवता येते.
2- हिमाचल प्रदेश– हिमाचल प्रदेश हे राज्य निसर्गाची खाण असून या ठिकाणी असलेले सुंदर डोंगर तसेच इतर नैसर्गिक पर्यटन स्थळे पर्यटकांमध्ये खूप आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे या ठिकाणी देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देत असतात.
जर तुम्ही हिमाचलला गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही गुरुद्वारातील मनिकरण साहिब येथे राहू शकतात. या ठिकाणी पर्यटकांचे खाणे आणि राहण्याची सोय मोफत केली जाते. या ठिकाणी तुमच्याकडून एक रुपया देखील घेतला जात नाही. त्यामुळे तुम्ही हिमाचलला गेलात तर या ठिकाणी जाऊन तुमचा राहणे व खाण्याचा पैसा वाचवू शकता.
3- तामिळनाडू– तामिळनाडू हे राज्य देखील निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असून या ठिकाणी देखील पर्यटनासाठी आणि सुंदर ठिकाणे आहेत. अध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील तामिळनाडूला महत्त्व असून या ठिकाणी असलेल्या तिरुवन्न मलाई जिल्ह्यात सुद्धा असे भगवान शिवाचे मंदिर आहे. याच मंदिराला अरुणाचलेश्वर शिव मंदिर असे देखील म्हणतात.
या ठिकाणी देखील देश-विदेशातील लाखो भावीक दर्शनासाठी येतात. तुम्हाला देखील तिरुवन मलाई या ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी असलेले श्री रामनश्रम या ठिकाणी राहू शकतात व त्या ठिकाणी राहणे आणि जेवणासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत.