Tractor Subsidy News : शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून काळाच्या ओघात मोठा बदल पहावयास मिळत आहे. पूर्वी छोट्या शेतकऱ्यांपासून ते मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांकडेच बैल जोडी असे. शेती मशागतीची कामे, शेतमाल वाहतुकीची कामे, मजुरांची वाहतुकीची कामे, बी बियाण्यांची वाहतूक तसेच खतांची वाहतूक बैलांच्या सहाय्याने आणि बैलजोडीच्या साह्याने केली जात असत.
मात्र आता काळ बदलला आहे. बैल जोडी आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. आता केवळ शेतकऱ्याचा दावणीला बैल पाहिजे म्हणून काही हौशी शेतकरी बैल ठेवतात. आता शेतीची कामे करण्यासाठी बैलांचा वावर आढळून येत नाही. शेतीच्या मशागतींच्या कामासाठी आता ट्रॅक्टरला प्राधान्य दिले जात आहे.
मशागतीची कामे व्यतिरिक्त ट्रॅक्टरच्या सहाय्याने बी-बियाण्यांची वाहतूक, खतांची, शेतमजुरांची वाहतूक, शेतीमालाची वाहतूक केली जात आहे. तसेच इतर सर्व तत्सम कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
ट्रॅक्टरच्या वापर वाढण्यामागे मजूर टंचाई देखील एक महत्त्वाचे कारण आहे. शिवाय ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची कामे जलद गतीने होत असल्याने आता ट्रॅक्टरचा वापर झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे, भाडेतत्त्वावर मशागतीसाठी ट्रॅक्टर लावले तर शेतकऱ्यांचा मशागतीचा खर्च हा वाढतोय.
यामुळे आता ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत. छोटे शेतकरी देखील आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे करत आहे. मात्र असे असले तरी अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे निधी अभावी ट्रॅक्टर नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत यादेखील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेता यावा यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे.
यासाठी शासनाकडून ट्रॅक्टर अनुदान योजना राबवली जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील जवळपास 15 लाख 29 हजार शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज केला आहे.
मात्र राज्य शासनाकडे अनुदानावर ट्रॅक्टर देण्यासाठी एवढा निधी उपलब्ध नाही यामुळे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी केवळ 25000 शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर मिळणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगितले गेले आहे.
विशेष बाब म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात अर्थातच 2022-23 या वर्षात राज्यातील 25000 शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर देण्यात आले आहे. यावर्षी देखील तेवढ्याच शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर मिळणार अशी माहिती समोर आली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच ही एक दिलासादायक बातमी राहणार आहे.
हे पण वाचा :- सोयाबीनच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या आणि त्यांच्या विशेषता, पहा…
किती अनुदान मिळतं
राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदीसाठी एक लाखापासून ते सव्वा लाखापर्यंतच कमाल अनुदान वितरित केलं जातं. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतचे अनुदान मिळतं तर राज्यातील अल्प,अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना, मागासवर्गीय प्रवर्गातील शेतकऱ्यांना, महिला शेतकऱ्यांना तसेच दिव्यांग शेतकऱ्यांना सव्वा लाखापर्यंत अनुदान दिलं जातं.
यामध्ये अनुदानाची रक्कम सोडून ट्रॅक्टरची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कंपनीला द्यावी लागते. अनेक शेतकरी अनुदानाची रक्कम प्राप्त करून उर्वरित रक्कम हप्त्याच्या माध्यमातून ट्रॅक्टर कंपनीला देतात.
हे पण वाचा :- 10वी, 12वीत पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार दहा हजार रुपये ! कोणते विद्यार्थी राहणार पात्र? वाचा….