Tur Rate Increased : सोयाबीन आणि कापूस बाजारात अपेक्षित भावात विक्री होत नसतानाच शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता बाजारात सोयाबीन, कापूस तसेच कांदा या नगदी पिकांना खूपच कमी भाव मिळत असून शेतकरी राजा यामुळे बेजार झाला आहे.
मात्र राज्यातील तुर उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरीचे दर चांगलेच तेजीत आले आहेत. तूर आपल्या महाराष्ट्रात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यात मोठ्या प्रमाणात शेती होते. बहुतांशी शेतकरी बांधव या नगदी पिकावर अवलंबून आहेत. प्रामुख्याने मराठवाडा तसेच विदर्भातील शेतकरी या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करतात.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी निघाली; तुमचा नंबर लागला की नाही?,…
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या तुरीला आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत असून आगामी काही दिवसात यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार तुरीला लवकरच 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळू शकतो. खरं पाहता यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे तुर पिकावर वेगवेगळ्या रोगांचे आणि कीटकांचे सावट पाहायला मिळाले. यामुळे तू उत्पादनात घट झाली. अशातच आता लग्नसराई आणि फेस्टिवल सीजन सुरू झाला आहे.
हे पण वाचा :- Interesting Gk question : अशी कोणती जागा आहे जिथे 100 लोक गेले तर फक्त 99 लोक परत येतात?
यामुळे तुरीला बाजारात चांगली मागणी आहे. बाजारात मागणी आणि कमी उत्पादनामुळे पुरवठा कमी या समीकरणाने तुरीला चांगलाच भाव मिळू लागला आहे. सध्या साडेआठ हजार पर्यंतचे दर तुरीला मिळू लागले आहेत. विशेष बाब अशी की, येत्या दोन महिन्यानंतर तुरीला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक भाव मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून तूर आयात केली जाण्याची शक्यता आहे. पण तूर आयात करून देखील मागणीनुसार पुरवठा होणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे दरात तेजी कायम राहील असा अंदाज तज्ज्ञांचा आहे.
हे पण वाचा :- टाटा है तो सब मुमकिन है ! टाटाच्या ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे लवकरच बनणार धनवान; कारण की…..