स्पेशल

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आर. एम. धारिवाल आणि जगदीश जोशी यांच्या मदतीने बनला गुटखा किंग ! पाकिस्तानात ‘अस’ उभारल गुटख्याचं साम्राज्य

Published by
Ahmednagarlive24 Office

Gutkha King Dawood : मुंबई साखळी बॉम्बस्फोटचा मास्टरमाइंड, भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दाऊदवर विष प्रयोग झाला असल्याचे वृत्त नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते.

तेव्हापासून दाऊद हा गुगल वर चांगलाचं ट्रेंड करत आहे. लोकांना डॉन दाऊद इब्राहिम बाबत जाणून घेण्याची विशेष उत्सुकता आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे शेकडो काळे धंदे आहेत.

अनेक अमली पदार्थांची अवैध पद्धतीने विक्री करण्याचे काम दाऊद इब्राहिम करतो. मात्र, दाऊद इब्राहिम एवढे सारे काळे धंदे असतानाही पाकिस्तानात गुटखा व्यवसायातूनही चांगला जंगी पैसा कमावला आहे.

विशेष म्हणजे या व्यवसायात दाऊद याला भारतीयांची साथ मिळाली आहे. दोन भारतीयांनी दाऊदला या व्यवसायात मदत केली असून यामुळे दाऊद एक मोठा गुटखा किंग देखील बनला आहे.

दरम्यान आज आपण दाऊदला गुटखा व्यवसायात कोणत्या दोन भारतीयांनी मदत केली याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर पाकिस्तानात भारतीय गुटख्यांची मोठी मागणी होती.

दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा भारतीय गुटखा पाकिस्तानात खपत असे. यामुळे दाऊदने या व्यवसायात एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला.

असे सांगितले जाते की आर एम डी आणि माणिकचंद यांसारख्या गुटक्याची निर्मिती करणारे आर. एम. धारिवाल आणि गोवा या गुटक्याची निर्मिती करणारे जगदीश जोशी या दोघांमुळे दाऊद गुटखा निर्मितीत आला.

धारीवाल आणि जोशी हे पूर्वी एकत्रच काम करत असत. धारीवाल यांच्या कंपनीत जोशी कामाला होते.मात्र काम करताना जोशी यांना या व्यवसायाची नस सापडली आणि त्यांनी या व्यवसायात एन्ट्री घेतली.

जोशी यांनी गोवा हा गुटखा तयार केला आणि या गुटक्याने माणिकचंद आणि RMD या ब्रँडला कडाक्याची टक्कर दिली. मात्र धारीवाल आणि जोशी यांच्यामध्ये पैशावरून वाद होता.

दरम्यान हा वाद दाऊद यांच्यासमोर आला. यावर दाऊदने तोडगा काढून देण्याचे आश्वासन दिले.दरम्यान हा वाद पूर्णपणे मिटल्यानंतर दाऊदच्या भावाने जोशी च्या मदतीने भारतातून गुटखा बनवण्याची संपूर्ण मशीन मागवली आणि त्या ठिकाणी हा व्यवसाय थाटला.

कराचीपासून 160 किलोमीटर अंतरावर फायर गुटखा नावाची कंपनी दाऊदच्या भावाने सुरू केली. अशा तऱ्हेने डी कंपनी दोन भारतीयांच्या मदतीने पाकिस्तानात गुटख्याची सर्वात मोठी कंपनी म्हणून उभी राहिली.

Ahmednagarlive24 Office