युनियन बँकेच्या 399 दिवसांच्या एफडीमध्ये 4 लाख रुपये जमा केले तर किती रिटर्न मिळणार ? वाचा….

आज आपण युनियन बँक ऑफ इंडियाच्या 399 दिवसांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर करत आहे. त्यामुळे जर तुमचाही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाचा पर्याय एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Union Bank FD Scheme

Union Bank FD Scheme : भारतात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँका आहेत. या सरकारी बँकांच्या यादीत युनियन बँक ऑफ इंडिया चा देखील समावेश होतो. युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी FD वर अधिकचे व्याज ऑफर करत आहे. जर तुम्हीही नजीकच्या काळात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.

कारण की आज आपण युनियन बँक ऑफ इंडियाच्या 399 दिवसांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर करत आहे. त्यामुळे जर तुमचाही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाचा पर्याय एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.

कशी आहे युनियन बँक ऑफ इंडियाची 399 दिवसांची एफडी योजना

ही बँकेची सर्वाधिक परतावा देणारी योजना म्हणून ओळखली जाते. या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना अधिकचा परतावा मिळतो. यामुळे जेष्ठ लोकांसाठी ही एफडी योजना अधिक फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे.

399 दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना युनियन बँक ऑफ इंडिया 7.25% या व्याज दराने परतावा देत आहे. मात्र याच कालावधीच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 0.50 टक्के अधिकचे व्याज दिले जाते. म्हणजे ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.75 टक्के या दराने व्याज दिले जात आहे.

चार लाख जमा केले तर किती रिटर्न मिळणार?

युनियन बँक ऑफ इंडियाच्या या 399 दिवसांच्या एफडी योजनेत जर सामान्य ग्राहकाने चार लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटी वर चार लाख 29 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 29 हजार रुपये निव्वळ व्याज मिळणार आहे.

दुसरीकडे, याच कालावधीच्या एफडी योजनेत जर ज्येष्ठ नागरिक ग्राहकाने चार लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर त्यांना चार लाख 31 हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना युनियन बँक ऑफ इंडिया कडून 31 हजार रुपये निव्वळ व्याज म्हणून दिले जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe