अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- सध्या करोनाने जगभरात थैमान घातलं आहे. प्रत्येकजण यापासून संरक्षण होण्यासाठी विविध पर्याय अवलंबत आहे. परंतु वैज्ञानिकांच्या मते सध्यातरी लस नसल्याने प्रत्येकाने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत की ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्तीवाढेल.
१. पोषक आहार
पोषक आणि चौरस आहारामुळे आपली इम्युनिटी पावर वाढण्यास मदत होते. या आहारातून शरीराला जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने आणि सकस स्निग्धांश असे सारे पोषक घटक शरीराला मिळत असतात.
त्यामुळे घरी तयार केलेले ताजे, सकस आहार शक्यतो घ्या.
२ .प्राणायाम –
आपल्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये प्राणायामाचा समावेश करा. श्वसनमार्गाशी संबंधित व हवेतून पसरणा-या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी या श्वासोच्छवासाशी संबंधित या योगिक व्यायामाचे होणारे फायदे सिद्ध झाले आहेत.
कपालभाती आणि भ्रमरी यांसारख्या प्राणायाम पद्धती फुफ्फुसांना बळकटी देणारे, संसर्गांना आणि आजारांना रोखणारे व्यायाम म्हणून ओळखल्या जातात.
३) सकारात्मक विचार
आपल्या तारुण्यात आशावादी असलेल्या व्यक्तींचे आयुर्मान निराशावादी व्यक्तींच्या तुलनेत अधिक असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.
नकारात्मकतेचा संबंध चिंता, ताणतणावांची पातळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होण्याशी असल्याचे दिसून आले आहे.
दुस-या बाजूला, खळखळून हसण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती खरोखरंच वाढते असेही संशोधनांतून दिसून आले आहे.
४) पुरेशी झोप
झोपेचे महत्त्व आयुर्वेदात सांगण्यात आले आहे. विशेषत: करोनाचा धोका समोर दिसत असताना ही गोष्ट अधिकच गरजेची बनली आहे.
पुरेशा झोपेचा रोगप्रतिकारक यंत्रणेवर थेट परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासांतून सिद्ध झाले आहे.
अपुरी झोप घेणा-या व्यक्तींनी हवेवाटे पसरणा-या आणि श्वसनमार्गाच्या संसर्गांचा धोका अधिक असलेल्या त्यातील काही अभ्यासांतून असेही दिसून आले आहे.
५) धूम्रपान आणि मद्यपान करू नका –
सिगारेट्स तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे आणि त्यांच्यामुळे करोना व्हायरसचा धोका अधिकच वाढू शकतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, धूम्रपानामुळे करोनाची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये न्यूमोनियासारख्या गुंतागुंती उद्भवण्याचा धोका वाढतो.
धूम्रपानामुळे (ई-सिगारेट्सही) फुफ्फुसांची हानी होते व शरीरात अँटीबॉडीज अर्थात रोगाशी मुकाबला करणारी द्रव्ये निर्माण होण्याची प्रक्रिया क्षीण होते.
असे झाल्याने जंतूसंसर्गाचा, विशेषत: श्वसनमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो. अतिरिक्त मद्यसेवनाचाही दाह वाढणे आणि रोगप्रतिकार शक्ती क्षीण होण्याशी संबंध असल्याचे आढळून आला आहे.
६) व्यायाम करा –
चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे. सध्याच्या काळात, जीम, पार्क्स आणि स्वीमिंग पूल्स बंद असले तरीही शरीराच्या हालचालींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
घरच्या घरीच का होईना पण आवर्जून व्यायाम करा. नियमित शारीरिक हालचालींमुळे शरीरातील अँटीबॉडीजच्या निर्मितीमध्ये सुधारणा होते व रोगप्रतिकार शक्ती अधिक सक्रिय होते हे अनेक अभ्यासांतून सिद्ध झाले आहे.
७) योग्य सप्लिमेंट्स घ्या –
सर्वच सप्लिमेंट्स रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करत नाहीत. पण काही पदार्थ हे नक्कीच फायदेशीर ठरतात. इथे आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे सर्वच जीवनसत्वे किंवा खनिजांची सप्लिमेंट्स नैसर्गिक नसतात, त्यात काही कृत्रिम घटक असतात.
रोगप्रतिकार शक्तीला बळ देणारे आयुर्वेदिक पदार्थ मात्र अत्यंत परिणामकारक मानले जातात, कारण ते संपूर्णपणे वनौषधींपासून बनलेले असतात. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तुम्ही आले, लसूण, तुळस, आवळा आणि पुदिना यांच्यासारखे नेहमीच्या वापरातले पदार्थ वापरू शकता.
याखेरीज ज्येष्ठीमध, गुडुटी आणि अश्वगंधा यांच्यासारख्या वनौषधींची रोगप्रतिकार शक्तीवरील परिणामकारकता सिद्ध झालेली आहे.
अर्थात यातील काही वनौषधी नैसर्गिक रूपात सहज उपलब्ध नसतात. पण या वनौषधींचा अर्क असलेल्या सप्लिमेंट्समधूनही तुम्हाला त्यांचे फायदे मिळू शकतात.
८) तणावमुक्त जगा –
ताणतणावांचा आपल्या आरोग्यावर अतिशय मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीही क्षीण होते. ताणतणावांची पातळी कमी करण्यासाठी ध्यानधारणा हा सर्वात परिणामकारक उपाय आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही वेळी मनावरील ताण हलका करण्यासाठी या मार्गाचा वापर करता येतो.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com