स्पेशल

Investment In Gold: सोन्यात गुंतवणुकीसाठी वापरा ‘हे’ 5 पर्याय आणि मिळवा लाखोत परतावा! वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Investment In Gold:- गुंतवणुकीसाठी जे काही पर्याय आज उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रत्येकाचा सगळ्यात आवडता आणि जुना गुंतवणूक प्रकार असेल तर तो म्हणजे सोन्यातील गुंतवणूक हा होय. कारण गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते.

त्यामुळे बरेच गुंतवणूक तज्ञ देखील म्हणतात की, तुमची जी काही एकूण गुंतवणूक आहे त्यापैकी तुम्ही पंधरा ते वीस टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये करावी. भारतामध्ये सण उत्सवाच्या कालावधीत किंवा घरामध्ये लग्नकार्य असे कार्यक्रम असतील तर फार पूर्वीपासून सोन्याची खरेदी करण्याचा ट्रेंड आहे व त्या खरेदी मागील उद्देश गुंतवणूक हाच होता.

परंतु आता सोन्यातील गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले आहेत. याप्रमाणे आपण प्रत्यक्ष सोने खरेदी करतो त्या व्यतिरिक्त आता गोल्ड ईटीएफ तसेच गोल्ड म्युच्युअल फंड,सोव्हेरीन गोल्ड बॉण्ड आणि डिजिटल गोल्ड हे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध असून सोन्यातील गुंतवणुकीसाठी हे पर्याय फायद्याचे आहेत.

 सोन्यात गुंतवणुकीसाठी वापरा हे पर्याय आणि मिळवा चांगला परतावा

1- प्रत्यक्ष सोन्याची खरेदी प्रत्यक्षपणे सोन्याची खरेदी करणे हा एक सरळ आणि सोपा पर्याय असून गेल्या कित्येक वर्षापासून याच प्रकारे सोन्यात गुंतवणूक केली गेली आहे. या प्रकारामध्ये सोन्याची दागिने बनवणे तसेच सोन्याची बिस्किट किंवा नाणे खरेदी केली जातात.

पूर्वी शेतकरी कुटुंबामध्ये देखील शेतातील पीक आल्यानंतर ते बाजारपेठेत विकले की सोन्याची खरेदी केली जात असे व थोडे थोडे सोने विकत घेतले तरी एक फायदेशीर गुंतवणूक ठरत होती. या प्रकारामध्ये कमी भावात सोने खरेदी करणे व सोन्याचे भाव वाढतात त्यावेळी त्याची विक्री करून त्यातून नफा मिळवणे हा एक ट्रेंड यामध्ये आहे.

2- गोल्ड ईटीएफ हा एक फायदेशीर प्रकार असून यामध्ये तुम्हाला प्रत्यक्षपणे सोने विकत घेण्याची गरज नसते. त्याऐवजी तुम्ही युनिटमध्ये सोने विकत घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला जितके ग्राम सोने विकत घ्यायचे आहे तितके युनिट तुमच्याकडे जमा होतात.

या प्रकारामध्ये जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला डिमॅट खात्याची आवश्यकता असते.गोल्ड ईटीएफमध्ये किमान एक ग्राम सोन्यात गुंतवणूक करावी लागते.

ज्याप्रकारे शेअर बाजारामध्ये शेअरच्या किमतीत चढउतार होतात त्याप्रमाणे गोल्ड ईटीएफमध्ये देखील चढउतार होत असतात. या व्यवहारांमध्ये तुम्ही घेतलेले गोल्ड ईटीएफचे युनिट केव्हाही विकून त्यातून नका मिळू शकतात.

3- गोल्ड म्युच्युअल फंडमधील इन्वेस्टमेंट हा एक सर्वसाधारण म्युच्युअल फंड सारखाच प्रकार असून या माध्यमातून देखील तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात व  यामध्ये तुम्ही जितक्या पैशांची गुंतवणूक कराल तितके युनिट आपल्याला मिळतात.

गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खात्याची आवश्यकता नसते. गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये एसआयपीच्या द्वारे तुम्ही किमान पाचशे रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात.

4- सोव्हेरन गोल्ड बॉण्ड हा एक सोन्यातील गुंतवणुकीचा सुरक्षित आणि उत्तम पर्याय मानला जातो. विशेष म्हणजे सोव्हेरन गोल्ड बॉण्डची विक्री केंद्र सरकारच्या माध्यमातून रिझर्व बँकद्वारे होत असते व त्यामुळे हा पर्याय खूप सुरक्षित मानला जातो.

या पर्यायाने जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही कमीत कमी एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त चार किलो सोन्याची गुंतवणूक करू शकतात.

या बॉण्डचा कालावधी आठ वर्षाचा असतो व लॉक इन कालावधी पाच वर्षाचा आहे. पाच वर्षाच्या कालावधीनंतर तुम्ही तुमची गुंतवणूक काढू शकतात. यामध्ये तुम्हाला ठराविक व्याज दरवर्षी दिले जाते.

5- डिजिटल गोल्ड मधील इन्वेस्टमेंट डिजिटल गोल्डमधील गुंतवणूक हा एक उत्तम प्रकार मानला जातो व ती पेपरलेस असते. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे कागदपत्रे लागत नाही. तसेच या पद्धतीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष सोने सांभाळण्याची देखील गरज नसते.

आपण जे फोन पे किंवा गुगल पे यासारखे ॲप वापरतो.त्या माध्यमातून देखील तुम्ही डिजिटल गोल्ड गुंतवणुकीची सुविधा घेऊ शकतात. डिजिटल गोल्ड मधील गुंतवणूक तुम्ही नॅशनल स्पॉट एक्सचेंजच्या डीलर मार्फत करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil