भ्रष्टाचार जर आपण पाहिला तर साधारणपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतो व याची कीड समाजाला पोखरत चालली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कुठलेही काम करायला गेले तर पैसे दिल्याशिवाय काम होतच नाही. ते कितीही छोटे-मोठे काम का असेना.
तसेच बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की अनेक राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जातो व राजकीय क्षेत्रामध्ये ही भ्रष्टाचाराची कीड अगदी ग्रामपंचायतीपासून तर मंत्रालयापर्यंत आपल्याला दिसून येते. यामध्ये जर ग्रामपंचायतच्या दृष्टिकोनातून बघितले तर गावाच्या विकासाकरिता ग्रामपंचायतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो व या उपलब्ध निधीतून आवश्यक ती कामे करणे गरजेचे असते.
परंतु बऱ्याचदा ज्या कामासाठी निधी आलेला असतो ते काम आपल्याला पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही व आपल्याला बऱ्याचदा संशय असतो की आलेला पैसा हा खाल्ला गेला म्हणजेच भ्रष्टाचार झाला. परंतु या गोष्टीची माहिती कशी करावी हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे या लेखात आपण एक ऑनलाईन पद्धत पाहणार आहोत की त्यामुळे तुम्हाला कळू शकते की तुमच्या गावासाठी निधी किती आला व खर्च किती झाला?
सरपंचांने पैसे खाल्ले का? एका क्लिकने करा माहिती
आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे व यामुळे आता अनेक अशक्य गोष्टी या शक्य झालेले आहेत. या इंटरनेटच्या मदतीने प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या गावासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे व किती निधीचा खर्च करण्यात आला आहे याची माहिती चुटकीसरशी मिळू शकते.
यामध्ये जर ज्या कामासाठी निधीमंजूर झालेला आहे व तीच कामे झालेली नसतील तर मात्र आपल्याला सरपंच विरोधात तक्रार करता येऊ शकते. यामध्ये जर सरपंचांनी विकास कामांसाठी आलेला निधीमध्ये भ्रष्टाचार केला असेल तर त्याची पदावरून पाय उतारणी देखील होऊ शकते.
गावाला किती निधी मंजूर झाला? अशा पद्धतीने करा चेक
1- यामध्ये सगळ्यात अगोदर egramswaraj च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
2- त्या ठिकाणी खाली स्क्रोल करावे व असलेला प्लॅनिंग हा पर्याय निवडावा.
3- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर रिपोर्टिंग पर्यायावर टॅप करा.
4- येथे ग्रामपंचायत निहाय खर्च अहवाल पर्याय हा दिसल्यानंतर त्यावर क्लिक करा.
5- त्यानंतर या ठिकाणी एक नवे पेज ओपन होईल व ज्या आर्थिक वर्षाची माहिती तुम्हाला हवी आहे ती माहिती भरावी.
6- त्यापुढे राज्य, कॅटेगिरी आणि सब कॅटेगिरी टाकावी व कॅपच्या कोड टाका.
7- त्यानंतर गेट रिपोर्ट पर्यायावर टॅप करा.
8- त्यानंतर तुमचा गट जाणून घेऊन गाव शोधल्यानंतर तुमच्या गावात किती विकास निधी मंजूर झाला आहे आणि त्यातील किती निधी खर्च झाला आहे तुम्हाला लागलीच कळते.
वरील पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाला मिळालेला विकास निधी खर्च झालेला आहे परंतु गावात जर कामे झाले नसतील तर तुम्ही मेरी पंचायत या ॲपवर लॉगिन करून तुमच्या सरपंचाची तक्रार करू शकतात. यामध्ये जर सरपंच दोषी दिसून आला तर सरपंचाचे पद देखील जाऊ शकते.