Vande Bharat Express : सध्या महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेस विषयी मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. नुकतीच भारतीय रेल्वेच्या माध्यमातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान वंदे भारत ट्रेनची ट्रायल घेण्यात आली आहे.
या ट्रायल रन मध्ये वंदे भारत एक्सप्रेस जवळपास सात तासात मुंबई ते गोवा प्रवास करण्यास सक्षम ठरली आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गावरील वंदे भारत ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यानंतर लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून या मार्गावर ही गाडी सुरू केली जाणार आहे.
हे पण वाचा :- रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली मोठी भरती; आजच इथं करा अर्ज
अशातच राज्यातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावरील वंदे भारती एक्सप्रेस बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट आहे नागपूर-बिलासपुर वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. जसं की आपणास ठाऊकच आहे की, 14 मे 2023 पासून या मार्गावरील वंदे भारत ट्रेन बंद करण्यात आली होती.
त्या ऐवजी या मार्गावर तेजस एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती.आता आजपासून म्हणजे 17 मे 2023 पासून या मार्गावर पुन्हा एकदा वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. मात्र आतापर्यंत या मार्गावर 16 डब्ब्याची वंदे भारत ट्रेन चालवली जात होती परंतु आता केवळ ८ डब्ब्याची ट्रेन या मार्गावर सुरू राहणार आहे.
हे पण वाचा :- गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ स्टॉकने 74 हजाराचे बनवलेत 1 कोटी, पहा कोणता आहे तो स्टॉक?
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, नागपूर-बिलासपूर दरम्यान सुरू असलेली 16 डब्ब्याची वंदे भारत ट्रेन सिकंदराबाद तिरुपती या मार्गावर चालवली जात आहे तर तेथील आठ डब्यावाली ट्रेन आता नागपूर-बिलासपूर मार्गावर चालवली जाणार आहे.
16 डब्ब्याची वंदे भारत ट्रेन बंद करण्याचे कारण काय?
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने या मार्गावर आता 16 डब्याची वंदे भारत ट्रेन बंद करण्यात आली असून त्या ऐवजी आठ डब्याची वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. या वंदे भारत ट्रेनच्या नवीन रेकमध्ये एक एक्झिक्युटिव्ह कोच आणि सात चेअर कार कोच राहणार आहेत.
हे पण वाचा :- शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय ! ‘या’ कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना; पहा…