Vande Bharat Express Train : वंदे भारत एक्सप्रेस या देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन. ही ट्रेन 2019 मध्ये सुरू झाली. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवले गेली.
यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सद्यस्थितीला ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रातील अकरा महत्त्वाचा मार्गांवर ही गाडी सुरू झालीये.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
पुण्यालाही दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे पुण्याला लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन ची आणि तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळू शकते. खरेतर, नुकत्याच सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच विजयी झाल्यानंतर मुरलीधर मोहोळांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात आले.
ही पुणेकरांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट ठरली. दरम्यान मंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळांनी आपल्या कामांचा धडका सुरूच ठेवला आहे.
आज त्यांनी केंद्रीय रेल्वे आणि सुचना प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा केलीये. मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे रेल्वे मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी पुणे-दिल्ली दरम्यान, वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु व्हावी अशी आग्रही मागणी मांडली आहे.
तसेच पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर या दरम्यान, वंदे भारत सुरु केली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच पुणे दूरदर्शन केंद्र अद्ययावत व्हावे. पुणे ते जोधपूर दरम्यान सुरू असलेल्या रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढावी.
महत्त्वाची बाब अशी की मोहोळ यांच्या या सर्व मागणींवर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवलाय. त्यामुळे आगामी काळात पुण्याला वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि काही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहेत.