स्पेशल

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! 800 किलोमीटरचे अंतर फक्त 13 तासात, ‘या’ मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन!

Published by
Tejas B Shelar

Vande Bharat Railway News : वंदे भारत ट्रेन संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वे प्रवाशांमध्ये अल्पकालावधीत लोकप्रिय झालेली देशातील पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमीहायस्पीड ट्रेन.

ही ट्रेन सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने या गाडीचे संचालन सुरू करण्यात आले. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले.

आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आतापर्यंत अकरा वंदे भारत ट्रेनची भेट मिळालेली असून आगामी काळात आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळतील अशी शक्यता आहे.

मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना वंदे भारत ट्रेनची भेट मिळाल्याने रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा खूपच सुपरफास्ट झाला आहे. 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्याची क्षमता असणाऱ्या या ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास हा फारच सुपरफास्ट झालाय यात शन्काच नाही.

महत्त्वाचे म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस च्या यशानंतर भारतीय रेल्वेने वंदे भारत मेट्रो देखील सुरू केली आहे. एवढेच नाही तर वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील येत्या काही दिवसांनी रुळावर धावण्याची शक्यता आहे.

अशातच आता दिल्ली ते श्रीनगर दरम्यान लवकरच वंदे भारत ट्रेन चालवली जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होऊ लागला आहे. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या मार्गावर स्लीपर ट्रेन चालवली जाईल असे सुद्धा बोलले जात आहे.

या मार्गावर म्हणजेच दिल्ली ते श्रीनगर दरम्यान जर स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर 800 किलोमीटर लांबीचा प्रवास 13 तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीहून काश्मीर खोऱ्यात जाणारी ही पहिली ट्रेन देखील राहणार आहे.

जर या मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर ही गाडी नवी दिल्ली रेल्वे स्टेशन मधून रात्री सात वाजता सोडल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ही गाडी श्रीनगर येथे पोहोचणार आहे. या गाडीच्या तिकीट दराबाबत बोलायचं झालं दोन ते तीन हजार रुपये प्रति प्रवासी तिकीट दर राहू शकते असा दावा केला जातोय.

या वंदे भारत स्लीपर ट्रेनला या मार्गावरील अंबाला कॅन्ट जंक्शन, लुधियाना जंक्शन, कठुआ, जम्मू तवी, श्री माता वैष्णोदेवी कटरा, संगलदन, बनिहाल आणि श्रीनगर या स्थानकांवर थांबा दिला जाऊ शकतो असेही म्हटले जात आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar