Vande Bharat Train : देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आता वंदे भारत गाड्या धावत आहेत. देशातील तब्बल 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा अकरा वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेस नंतर वंदे भारत मेट्रो देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.
दरम्यान, आता स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत, ज्यामध्ये प्रवासी झोपून अगदीचं आरामात प्रवास करू शकतील. मात्र, स्लीपरनंतरही वंदे भारत विथ चेअर कार सुरूच राहणार आहे.
लवकरच प्रवाशांना वंदे भारत बद्दल एक चांगली बातमी मिळणार आहे. त्रिपुराला जोडणारा वंदे भारत लवकरच सुरू होणार असल्याचे राज्यसभा खासदारांनी सांगितले आहे.
राज्यसभा खासदार राजीव भट्टाचार्य म्हणाले की, त्रिपुरातील रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे, ज्यामुळे आता आगरतळा रेल्वे स्थानकावरून वंदे भारत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भट्टाचार्य म्हणाले, “मला सांगण्यात आले आहे की, वंदे भारत एक्स्प्रेस सारख्या गाड्या सुरू करण्याची पूर्व अट, ट्रॅकचे विद्युतीकरण आधीच पूर्ण झाले आहे.
वंदे भारत सेवा पुढील काही महिन्यांत आगरतळा येथून सुरू होईल. ज्याला त्रिपुरासारख्या राज्यासाठी महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी बूस्ट म्हणून पाहिले जाऊ शकते.
ईशान्येकडील कनेक्टिव्हिटी क्षेत्रात बदल घडवून आणल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. खासदार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येला एक नवीन ओळख दिली आहे. त्रिपुरा हे देशाच्या या भागातील सर्वात दुर्लक्षित राज्यांपैकी एक होते.
पीएम मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी 2016 मध्ये त्रिपुरामध्ये ब्रॉडगेज कनेक्टिव्हिटी आणली – अवघ्या दोन वर्षांत, दक्षिण त्रिपुरा जिल्ह्याच्या सर्वात दूरच्या कोपऱ्यात असलेल्या सबरूमपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी विस्तारली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या वर्षी मे महिन्यात पंतप्रधानांनी आसामची पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली होती, जी गुवाहाटी ते न्यू जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) ला जोडते. NFR ने त्याच्या नेटवर्कचे 64 टक्के विद्युतीकरण केले आहे.