Vande Bharat Train संदर्भात मोठी अपडेट, महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे मार्गांवर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन बंद होणार ?

सध्या स्थितीला ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. यापैकी 11 वंदे भारत एक्सप्रेस आपल्या महाराष्ट्रातून धावतात. महाराष्ट्राला नुकत्याच काही दिवसांपूर्वी तीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. 16 सप्टेंबर 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

Published on -

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन. ही ट्रेन 2019 मध्ये रुळावर आली होती. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू करण्यात आले.

सध्या स्थितीला ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. यापैकी 11 वंदे भारत एक्सप्रेस आपल्या महाराष्ट्रातून धावतात. महाराष्ट्राला नुकत्याच काही दिवसांपूर्वी तीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.

16 सप्टेंबर 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

मात्र आता या तीन पैकी एक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लवकरच बंद होऊ शकते असा दावा केला जाऊ लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन ला प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये.

यामुळे या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस बंद करण्याचे नियोजन आखले जात असल्याचा मोठा दावा होऊ लागला आहे. या वंदे भारत ट्रेनमधील 80% हून अधिक सीट्स रिकाम्या राहत आहेत. म्हणजे जवळपास 1200 हून अधिक सीट्स रिकाम्या राहत आहेत.

या ट्रेनची एकूण प्रवासी क्षमता 1440 जणांची आहे. मात्र प्रत्यक्षात बाराशे हुन अधिक जागा रिक्त राहत आहेत. यामुळे ही गाडी बंद होण्याचे चिन्ह आहे. तर काही अधिकाऱ्यांनी या गाडीच्या डब्यांची संख्या कमी होऊ शकते असे म्हटले आहे.

प्रवासी क्षमता वाढली नाही तर या गाडीच्या डब्यांची संख्या वीस वरून आठवर आणली जाऊ शकते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 20 डब्ब्यांची ही वंदे भारत एक्सप्रेस देशातील दुसरी वंदे भारत ट्रेन आहे. यामुळे जर या गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर याचे डबे कमी होऊ शकतात.

एवढेच नाही तर काही मीडिया रिपोर्ट मध्ये या गाडीला डब्बे कमी केल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही तर ही गाडीच रद्द होऊ शकते असा दावा केला आहे. यामुळे रेल्वे प्रशासन या गाडी संदर्भात आगामी काळात काय निर्णय घेणार ही गोष्ट पाहण्यासाठी ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!