स्पेशल

Vande Bharat Train: मुंबईवरून वंदे भारत ट्रेनने जा साई दर्शनाला, वाचा वेळापत्रक आणि तिकीट दर

Published by
Ajay Patil

Vande Bharat Train:-  वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून सध्या वाहतूक क्षेत्रामध्ये एक नवीनच क्रांती घडून येत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतीय रेल्वेचे एक प्रगत स्वरूप असलेले वंदे भारत ट्रेन  सध्या टप्प्याटप्प्याने भारताच्या विविध शहरांदरम्यान सुरू करण्यात येत आहे. या ट्रेनच्या माध्यमातून देशातील महत्त्वाची असलेली शहरांमधली कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येत आहे. वातानुकूलित असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस एक आरामदायी आणि जलद प्रवासाची अनुभूती देतात.

या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राकरिता देखील चार वंदे भारत ट्रेनचे गिफ्ट मिळाले आहे. त्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगरी शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपुर या शहरा दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेले आहेत.

यातील आपण मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या ट्रेनचा विचार केला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेला होता. या ट्रेन सुरू झाल्यामुळे आता प्रवाशांचा वेळ तर वाचतोच परंतु जलद प्रवासाचा देखील अनुभव प्रवाशांना घेता येतो. त्या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण मुंबई ते साईनगर शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक आणि तिकीट दर पाहणार आहोत.

 मुंबई ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक

जर आपण मुंबई ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक पाहिले तर ती सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सीएसएमटी होऊन सुटते आणि साईनगर शिर्डी येथे पाच तास वीस मिनिटांनी म्हणजे सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी पोहोचते. ही वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटी मुंबईवरून सुटल्यानंतर दादर, ठाणे आणि नाशिक रोड स्टेशनवर थांबते.

या पद्धतीने जर या वंदे भारत एक्सप्रेसचा शिर्डी ते मुंबई असे वेळापत्रक पाहिले तर ते साईनगर शिर्डी येथून सायंकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी निघते आणि पाच तास 25 मिनिटांचा प्रवास करून मुंबईला रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते. आठवड्यातून मंगळवारी मुंबई आणि शिर्डी या ठिकाणहून ही वंदे भारत एक्सप्रेस नसते.

 असे आहेत तिकीट दर

जर आपण मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर पाहिले तर ते चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचकरिता अनुक्रमे 975 रुपये आणि 1840 रुपये लागतात. या तिकीट दरामध्ये केटरिंग चा देखील समावेश करण्यात आलेला आहे. समजा प्रवाशांनी जर ऑन बोर्ड केटरिंग ची निवड केली नाही तर  तिकीट दर कमी होतात.

ते म्हणजे चेअर कारकरिता 840 रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह चेअर कोचसाठी 1770 रुपये एवढे तिकीट लागते. दुसरे जर तुम्हाला साईनगर शिर्डी या ठिकाणहून मुंबई  असा प्रवास करायचा असेल तर चेअर कारकरिता 1130 आणि एक्झिक्यूटिव्ह चेयर कोच करिता 2020 रुपये तिकीट दर असतील. यामध्ये केटरिंग शुल्काचा देखील समावेश असणार आहे. परंतु तुम्हाला केटरिंगची सुविधा घ्यायचे नसेल तर चेअर कार करिता  840 आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोच करिता 1670 रुपये तिकीट लागेल.

Ajay Patil