स्पेशल

डाळिंबात केला आंतर पिकांचा अनोखा प्रयोग ! वर्षाला मिळवला 6 लाख नफा

Published by
Ajay Patil

आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि शेतीच्या आधुनिक पद्धतीमुळे शेती क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून गेलेला आहे. अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील शेतकरी आता नियोजनबद्ध पद्धतीने पिके घेऊन लाखोत उत्पन्न मिळवतात. तसेच हवामान बदलामुळे शेतीवरच विपरीत परिणाम होतो व त्यावर मात करण्यासाठी देखील शेतकरी आता पुढे सरसावले असून शेतीमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करून मोठ्या प्रमाणावर भरपूर पिकांचे उत्पादन घेतात.

शेतीमध्ये गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर बदलाचे वारे वहायला लागले असून त्यामुळे शेतीमधून देखील चांगला पैसा मिळवता येतो हे शेतकऱ्यांनी उभ्या जगाला दाखवून दिलेले आहे.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी वसंत पिंपळे यांचा एक शेतीचा अनोखा प्रयोग पाहिला तर तो थक्क करणार आहे. त्यांनी डाळिंबाच्या एका शेतामध्ये सात अंतरपिके लागवड करून त्यांचे यशस्वी उत्पादन घेण्याचा प्रयोग गेला व त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळवलेले आहे. त्यांनी केलेले आंतर पिकांचे नियोजन आणि त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 डाळिंबात केला आंतरपिकांचा प्रयोग

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नारायणगाव गावाचे रहिवासी असलेली वसंत पिंपळे यांनी डाळिंब शेतीमध्ये आंतरपीकांचा अनोखा प्रयोग केला. वसंतरावांनी 25 एकर शेतीमध्ये डिसेंबर महिन्यात डाळिंबाची लागवड केली व ती लागवड करताना डाळिंबाच्या दोन ओळींमधील अंतर बारा फुटाचे ठेवले

जर आपण डाळिंबाचा उत्पादन कालावधी पाहिला तर तो लागवडीपासून साधारणपणे 18 महिने ते दोन वर्षाचा असतो. त्यामुळे एवढ्या मोठ्या कालावधी हातात असल्याने त्यांनी या डाळिंबाच्या पिकांमध्ये आंतर पिकांचे नियोजन केले व एक ते दोन नाही तर तब्बल सात प्रकारची पिके त्यांनी डाळिंबामध्ये लागवड केली.

 अशाप्रकारे डाळिंबामध्ये केले आंतर पिकांचे नियोजन

जेव्हा त्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये डाळिंबाची लागवड केली तेव्हा डाळिंबाच्या लागवडीनंतर अवघ्या दोन दिवसात पपई लागवड केली व त्याच्यात पुढच्या दोन दिवसात पपईच्या रांगांमध्ये खरबुजाची लागवड केली. त्यानंतर डाळिंबाच्या दोन झाडांमध्ये जे काही अंतर होते त्या अंतरामध्ये शेवंती या फुल पिकाची लागवड केली.

या आंतरपीकांचे नियोजन करत असताना जेव्हा पपई या पिकाची वाढ चांगली झाली आणि यादरम्यान लावलेले खरबुजाची संपूर्ण काढणी झाल्यानंतर ते पीक निघून गेले व त्यानंतर त्या खरबुजाच्या जागी त्यांनी झेंडूची लागवड त्याच बेडवर केली.

इतकेच नाहीतर डाळिंबाच्या शेतीमधील जे काही बांध होते त्यावर गवती चहा आणि अंजिराची लागवड केली व त्यापासून देखील वेगळे उत्पन्न मिळवण्यात यशस्वी झाले. तसेच या शेतामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना मोकळी जागा दिसली त्या जागेवर मक्याची लागवड करून त्यापासून देखील त्यांनी उत्पन्न मिळवले.

 गवती चहापासून मिळाले एक लाखांचे उत्पन्न

त्यांनी 25 एकर डाळिंबाच्या शेताच्या जे काही बांध होते त्यावर गवती चहाची लागवड केलेली असून त्याच ठिकाणी अंजीर देखील लावले आहे. या गवती चहाची काढणी करून ते मॉलमध्ये थेट विक्री करतात. दररोज त्यांना 50 ते 80 किलो गवती चहाचे उत्पादन मिळते व तेवढ्या गवती चहाची ती विक्री करतात.

या गवती चहाला किमान 38 तर कमाल 80 रुपयांचा दर मिळतो. दिवसाला चार हजार रुपयांची गवती चहा ते विकतात. म्हणजेच यानुसार हिशोब केला तर एका महिन्याला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना गवती चहा विक्रीतून मिळतो.

गवती चहा सोबतच लावलेली पपई तसेच शेवंती, झेंडू, खरबूज व मका इत्यादी पिकातून संपूर्ण खर्च वजा जाऊन त्यांना सहा लाखांचा देऊळ नफा मिळण्याची अपेक्षा आहे. या सगळ्या आंतरपीकातून जे काही त्यांना उत्पन्न मिळाले त्यातून डाळिंब पिकासाठी लागणारा सर्व खर्च वसूल होण्यास मदत झाली आहे.

तसेच आंतरपीकांमुळे शेतीतील वेगवेगळ्या पिकांसाठी करण्यात आलेले  रोग नियंत्रणासाठीच्या उपाययोजना आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी देखील फायदा झाला. झेंडू आणि शेवंती या फळ पिकांमुळे किडीवर नियंत्रण देखील मदत होते असे देखील त्यांनी म्हटले.

Ajay Patil