Vastu Shastra Rules : तुमचाही वास्तुशास्त्रावर विश्वास आहे का? मग आजची बातमी तुमच्या कामाची आहे. खरंतर आपल्याला आपल्या जवळचे मित्र नातेवाईक वेळोवेळी गिफ्ट देत असतात. वाढदिवस, लग्न, लग्नाचा वाढदिवस, किंवा इतर छोट्या मोठ्या फंक्शनच्या निमित्ताने आपल्या जिवलगांकडून आपल्याला गिफ्ट दिले जात असते.
आपणही आपल्या जिवलगांना वेळोवेळी गिफ्ट देत असतो. काही लोक सणासुदीच्या काळात आपल्या जिवलगांना गिफ्ट देतात. मात्र वास्तुशास्त्रात गिफ्ट देण्याबाबत काही नियम आहेत. काही वस्तू चुकूनही गिफ्ट म्हणून घेऊ नयेत तसेच गिफ्ट म्हणून देऊ नयेत असा नियम वास्तुशास्त्रात आहे.
दरम्यान आज आपण कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या की आपण मोफत घेतल्या नाही पाहिजेत म्हणजेच गिफ्ट म्हणून घेतल्या नाही पाहिजेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या वस्तू मोफत घेऊ नयेत
माचीस : माचीस ही चुकूनही मोफत घेऊ नये. कोणाकडूनही माचीस मोफत घेऊ नये तसेच कोणालाही माचीस मोफत देऊ नये असे वास्तुशास्त्रात म्हटले गेले आहे. यामुळे राहू ग्रहाची बाधा तयार होते आणि आर्थिक तंगी येण्याची भीती असते.
इलेक्ट्रॉनिक वस्तू : कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू मोफत किंवा गिफ्ट म्हणून घेऊ नये असे केल्यास घरात दरिद्री येते. वास्तुशास्त्रात कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू गिफ्ट म्हणून स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे.
पाकीट किंवा पर्स : पाकीट किंवा पर्स ही अशी वस्तू आहे जी आपल्या पैशांशी निगडित असते. यामुळे कोणाकडूनही पाकीट किंवा पर्स गिफ्ट म्हणून स्वीकारू नये. असे केल्यास आपल्याकडील पैशांचे योग दुसऱ्याकडे ट्रान्सफर होतात.
रुमाल : वास्तुशास्त्रानुसार रुमाल ही अशी वस्तू आहे जी कुणाकडूनही गिफ्ट म्हणून घेऊ नये तसेच कुणालाही गिफ्ट म्हणून देऊ नये. जर कोणी रुमाल गिफ्ट म्हणून घेतला किंवा दिला तर अशा व्यक्तीला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो.
मीठ आणि तेल : वास्तू शास्रानुसार कोणाकडूनही मोफत मीठ अन खाण्याचे तेल घेऊ नका. मीठ अन तेल फूकट घेतल्याने कर्जाचे प्रमाण वाढते. तसेच आरोग्य विषयक समस्या देखील वाढतात. त्यामुळे कोणाकडूनही मीठ , तेल मोफत घेऊ नये. यामुळे आपल्याला आर्थिकहानी होऊ शकते तसेच आरोग्य विषयक समस्या देखील निर्माण होऊ शकतात.