Vedanta Share Price : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजी दिसत आहे. काल शुक्रवार, 31 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 923.78 अंकांनी वधारून 77683.59 वर अन एनएसई निफ्टी 317.50 अंकांनी वधारून 23567 वर खुला झाला. सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये देखील मोठे उत्साहाचे वातावरण काल पाहायला मिळाले.
दरम्यान याच तेजीच्या काळात शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. तसेच ब्रोकरेजकडून काही कंपन्या आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसतील असा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय.

वेदांता लिमिटेड कंपनीच्या स्टॉकबाबत बोलायचं झालं तर या कंपनीचा स्टॉक आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल अशी आशा आहे. काल वेदांताचा स्टॉक शेअर बाजारात 2.50 टक्क्यांनी वधारला होता अन सध्या हा स्टॉक 443.55 ट्रेड करतांना दिसतोय.
मात्र आगामी काळात वेदांता शहर च्या किमती आणखी वाढणार आहेत. ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली असून नवीन टार्गेट प्राईज सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.
वेदांता स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती
वेदांता लिमिटेड शेअरची प्रिव्हियस क्लोजिंग प्राईस 432.45 रुपये होती. मात्र 31 जानेवारी रोजी दिवसभरात हा शेअर 426.90 – 443.80 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. म्हणजेच काल या शेअरच्या किमती काहीशा वाढल्या होत्या.
वेदांता स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिला?
मागील 5 दिवसात वेदांता लिमिटेड शेअर 2.12 टक्क्यांनी वाढला आहे. पण मागील 1 महिन्यात हा स्टॉक, -0.20 टक्क्यांनी घसरला आहे. मागील 6 महिन्यात -1.02 टक्क्यांनी घसरलाय.
अन हा स्टॉक मागील 1 वर्षात 65.20 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच YTD आधारावर हा स्टॉक -0.20 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र 5 वर्षात हा शेअर 231.01 टक्क्यांनी अन लॉन्ग टर्ममध्ये 12719.36 टक्क्यांनी वाढला आहे.
टार्गेट प्राईस काय आहे?
वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी मार्केट विश्लेषकांनी नवीन टारगेट प्राईज दिली आहे. CLSA ब्रोकरेज फर्मने या स्टॉक साठी ‘Outperform’ रेटींग जाहीर केली आहे. CLSA ब्रोकरेज फर्मने हा स्टॉक 530 रुपयांना टच करणार असा दावा केला आहे.