Vedanta Share Target Price : आज बुधवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज तेजी आली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आज बीएसई सेन्सेक्स 275.38 अंकांनी वधारून 76176.79 वर अन एनएसई निफ्टी 91.35 अंकांनी वधारून 23048.60 वर खुला झालाय. दरम्यान या तेजीच्या काळात वेदांता कंपनीच्या शेअरबाबत सुद्धा सकारात्मक बातमी समोर येत आहे.
वेदांता कंपनीचा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना आगामी काळात चांगला परतावा देणार असल्याची आशा व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत आज आपण वेदांता कंपनीच्या शेअरची सध्याची स्थिती,
त्याचा 52 आठवड्याचा उच्चांकी स्तर तसेच निचांकी स्तर, गेल्या पाच वर्षांमधील शेअरची कामगिरी, तसेच यासाठी ब्रोकरेज फर्मने काय टार्गेट प्राईज दिली आहे? याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या शेअरची प्रेविअस क्लोजिंग प्राईस 425.35 रुपये इतकी होती. दरम्यान आज, 29 जानेवारी 2025 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीचा शेअर 1.24 टक्क्यांनी वधारला आहे. सध्या हा स्टॉक 430.70 रुपयांवर ट्रेड करत आहे.
स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु होताच हा शेअर 428.50 रुपयांवर ओपन झाला अन सकाळी 10.16 वाजता वेदांता लिमिटेड कंपनी शेअरचा दिवसभरातील उच्चांक 430.35 रुपयांवर होता, तर निच्चांकी स्तर 424.30 रुपये होता. दरम्यान टॉप ब्रोकरेज फर्मने हा स्टॉक आगामी काळात चांगला परतावा देणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी नवीन टारगेट प्राईज देखील देण्यात आली आहे.
मंडळी आज या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 526.95 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 249.50 रुपये इतका राहिला. सध्या वेदांता लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,68,303 कोटी इतके आहे.
तसेच सध्या या कंपनीवर 79,808 Cr रुपये इतकं कर्ज आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीचा स्टॉक हा 249.50 ते 526.95 यादरम्यान ट्रेड करत होता. हा स्टॉक मागील 5 दिवसात -3.20 टक्क्यांनी घसरला आहे. मागील 1 महिन्यात -2.04 टक्क्यांनी घसरलाय अन मागील 6 महिन्यात वेदांता लिमिटेड शेअर -4.07 टक्क्यांनी घसरला आहे.
पण मागील 1 वर्षात वेदांता लिमिटेड शेअर 60.83 टक्क्यांनी वाढलाय. मात्र YTD आधारावर वेदांता लिमिटेड शेअर -3.09 टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, मागील 5 वर्षात हा स्टॉक 221.42 टक्क्यांनी वाढलाय अन लॉन्ग टर्ममध्ये वेदांता लिमिटेड शेअर 12,347.98 टक्क्यांनी वधारला आहे.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्म वेदांता कंपनीच्या शेअरसाठी बुलिश आहे. या ब्रोकरेजने वेदांता शेअर साठी बाय रेटिंग दिलेली आहे. अर्थातच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी 663 रुपये टार्गेट प्राईस सुद्धा दिली आहे. अर्थातच आगामी काळात या स्टॉकच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.