अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या नात्यानं मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूड चाहत्यांचं लक्ष खिळवून ठेवलं आहे.
रिलेशनशिप, त्यानंतरची वाढती जवळीक आणि आता थेट लग्न, असा विकी आणि कतरिनाचा प्रवास पाहून चाहत्यांनाही त्यांच्या या प्रेमाच्या नात्याचा हेवा वाटत आहे.
राजस्थानमधील एका ऐतिहासिक स्थळी ही जोडी विवाहबंधनात अडकली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कतरिनाच्याच एका निकटवर्तीयांनी विकीनं तिला लग्नासाठी कसं प्रपोज केलं होतं, याबाबतचा प्रश्न विचारला.
ज्याचं उत्तर देताना या व्यक्तीकडून मोठा उलगडा करण्यात आला आहे. विकी फारच प्रेमळ असून, सध्या तो कतरिनाच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे.
किंबहुना या दोघांनाही एकमेकांची इतकी सवय लागली आहे, हे पाहून त्यांचे मित्रही आश्चर्यचकित होतात. कोरोना काळ आणि दरम्यानचा लॉकडाऊन यामुळे ते अधिक जवळ आले.
विकीनं मोठ्या फिल्मी अंदाजा कतरिनाला लग्नाची मागणी घातली. त्यानं कतरिनासाठी डार्क चॉकलेट ब्राऊनी ऑर्डर केल्या. ज्यानंतर त्याने हा बॉक्स एखाद्या सर्वसामान्य बॉक्सप्रमाणे कतरिनाकडे पोहोचवला.
कतरिनाला मात्र त्याबाबत काहीही कल्पना नव्हती. तिनं जेव्हा हा ब्राऊनीचा बॉक्स खोलला त्यावेळी त्यामध्ये ‘तू माझ्याशी लग्न करशील?’ अशा शब्दांत तिला विकीनं लग्नाची मागणी घातली होती.