Viral News : अतिथी देवो भव, भूतदया परमो धर्म हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. हिंदुस्थानात अवतरलेल्या थोर संत, महात्म्यांनी देखील प्राणिमात्रांवर प्रेम करा असा सल्ला दिला आहे. पसायदानात संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भुता परस्पर पडो, मैत्र जीवांचे म्हणजे सर्वप्रथम दृष्टांचे दृष्टपण सुटून जावो त्यांच्यात सत्कर्माची आवड निर्माणा व्हावो, असे झाल्यास कोणाचे कोणाशी शत्रुत्व राहणार नाही.
सर्व प्राणीमात्रांमध्ये मैत्रीचा व्यवहार संबंध निर्माण होईल. अस मत संत ज्ञानोबारायांनी आपल्या पसायदानात मांडलं आहे. हेच कारण आहे की आपल्या घरात वाड-वडिलांनी, थोरा-मोठ्यांनी आपल्याला नेहमीच मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याचा, त्यांना हानी न पोहोचवण्याचाच सल्ला दिला आहे.
हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! अर्धा एकरात ‘या’ फळपिकाची शेती सुरु केली, अन मिळवलं तब्बल 11 लाखांचं उत्पन्न, वाचा ही यशोगाथा
अशा या संस्कृतीत तयार झालेल्या आपल्या प्रत्येकामध्ये भूतदया आढळते. आपण प्रत्येकजण प्राण्यांवर अपार प्रेम करत असतो. दरम्यान अकोला जिल्ह्यात असंच एक कौतुकास्पद उदाहरण समोर आलं आहे. अकोल्याच्या रघुवीरनगर येथील एका डॉक्टराने आपल्या गाईने एका गोंडस वासराला जन्म दिला म्हणून त्या वासराचे चक्क बारस अन नामकरण सोहळा आयोजित केला होता.
डॉक्टर गजानन टिकार यांची गाय नंदिनी हिने 5 मार्च रोजी एका गोंडस वासराला जन्म दिला. त्यामुळे आनंदित झालेल्या टिकार कुटुंबियाने या वासराचं बारसं करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पै-पाहुण्यांना निमंत्रण गेलं. आजूबाजूच्या परिसरातील लोक देखील या सोहळ्याला हजर राहिले. आलेल्या पाहुणे मंडळींना जेवणासाठी बटाटेवडा आणि जलेबी चा बेत देखील आखण्यात आला.
हे पण वाचा :- बातमी कामाची ! कमी व्याजदरात कर्ज हवे आहे का? मग करा हे एक काम, स्वस्तात अन तात्काळ Loan मिळणार
या बारशाला हजर राहिलेल्या पै-पाहुण्यांच्या उपस्थितीत अन माहूरच्या दत्त शिखराचे मुख्य पुजारी यांनी केलेल्या मंत्रोच्चारात या वासराला शंभू असं नाव ठेवण्यात आलं. सोबत पाळणा गीत देखील यावेळी म्हटले गेले. एकंदरीत हा संपूर्ण सोहळा मोठा नेत्र दीपक ठरला आणि पै पाहुण्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून या सोहळ्याला शाही बनवलं.
टिकार कुटुंबीयांनी आपल्या प्राण्यावरील प्रेमापोटी हा कौतुकास्पद असा सोहळा आयोजित केला असल्याने या सोहळ्याची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. डॉक्टर साहेबांच्या या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक देखील होत आहे. टिकार कुटुंबीयांच्या घरी यानिमित्ताने आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ महिन्यात होणार 30 हजार शिक्षकांची भरती; दीपक केसरकर यांची माहिती