स्पेशल

हिवाळ्यामध्ये मध्यप्रदेशातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या आणि फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटा! जाणून घ्या माहिती

Published by
Ajay Patil

Tourist Places In India:- भारतामध्ये प्रत्येक राज्यात अनेक महत्त्वाचे असे पर्यटन स्थळे असून प्रत्येक राज्याला निसर्गाने भरभरून असे दिले आहे. त्यामुळे अनेक पर्यटन स्थळे आपल्याला प्रत्येक राज्यांमध्ये दिसून येतात व त्या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

अगदी याचप्रमाणे मध्यप्रदेश राज्याचा जर विचार केला तर हे आपल्या महाराष्ट्राच्या अगदी शेजारील राज्य असून या राज्याला भारताचे हृदय असे म्हटले जाते. भारताच्या अगदी मध्यभागी वसलेले हे राज्य अत्यंत महत्त्वाचे असून या ठिकाणाची समृद्ध अशी संस्कृती तसेच ऐतिहासिक वारसा व नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून ते अतिशय प्रसिद्ध आहे.

तसेच मध्यप्रदेश राज्य हे भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक असून हिवाळाच नाही तर कुठल्याही मोसमामध्ये तुम्ही या ठिकाणी जर फिरायला गेला तरी फायद्याचे ठरते.

त्यामुळे या कालावधीत किंवा या हिवाळ्यामध्ये तुम्हाला जर कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठेही फिरायला जायचा प्लान बनवायचा असेल किंवा तुमचा विचार असेल तर तुम्ही मध्यप्रदेश राज्याचे निवड करू शकतात.

त्यामुळे या लेखामध्ये आपण मध्यप्रदेश राज्यातील काही ठिकाणांची माहिती थोडक्यात घेणार आहोत. जे कुटुंब किंवा मित्रांसोबत फिरण्यासाठी खूप उत्तम असे डेस्टिनेशन आहेत.

कुटुंब किंवा मित्रांसोबत ट्रीप प्लान करा आणि मध्यप्रदेश राज्यातील या ठिकाणांना भेट द्या

1- पंचमढी- पंचमढी हे एक मध्यप्रदेश राज्यातील अतिशय सुंदर आणि निसर्ग संपन्न असे हिल स्टेशन आहे. मध्यप्रदेश राज्यातील नर्मदापुरम जिल्ह्यात हे हिल स्टेशन असून ते त्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देत असतात.

निसर्गप्रेमींकरिता पंचमढी हे एक नंदनवन म्हटले जाते. या ठिकाणी असलेले थंडगार हवामान तसेच हिरव्यागार दऱ्या आणि घनदाट जंगले पर्यटकांना आकर्षित करतात व हिवाळ्याच्या मोसमात तर या ठिकाणाचे दृश्य अतिशय सुंदर असते. त्यामुळे हिवाळ्यात पंचमढीला भेट देणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

2- मांडला- मांडला हे ठिकाण नर्मदा नदीच्या काठावर वसलेले असून शांतता आणि सौंदर्याने भरलेले एक डोंगराळ क्षेत्र आहे. हिवाळ्यामध्ये ते अतिशय आकर्षक दिसते व या ठिकाणचे दृश्य जवळपास शिमला किंवा नैनीताल सारखेच दिसते. मांडलाचे नैसर्गिक सौंदर्य जर बघितले तर या ठिकाणी असलेले उंच पर्वत तसेच धुक्याने झाकलेली दृश्य अतिशय मनमोहक दिसतात.

त्यामुळे मांडला हे एक उत्कृष्ट असे ठिकाण समजले जाते. त्यामुळे हिवाळ्यात जर तुम्ही फिरण्यासाठी एखाद्या उत्तम ठिकाणाचा विचार करत असाल तर मांडला आहे उत्तम डेस्टिनेशन ठरेल. हिवाळ्यामध्ये या ठिकाणाचे वातावरण हिल स्टेशन सारखेच दिसते.

4- ओरछा- मध्यप्रदेश राज्यातील बेटवा नदीच्या काठावर ओरछा हे वसले असून या ठिकाणी असलेला ऐतिहासिक वारसा हा खूप समृद्ध आहे व तसेच हिवाळ्यात, उन्हाळा व पावसाळ्यामध्ये फिरण्याकरिता हे एक उत्कृष्ट व सुंदर असे ठिकाण म्हणून ओळखले जाते.

तसेच या ठिकाणी अनेक धार्मिकस्थळे देखील आहेत.या ठिकाणी तुम्ही भेट देऊन काही क्षण शांततेमध्ये व्यतीत करू शकतात. तसेच या ठिकाणी रिव्हर राफ्टिंग सारख्या उपक्रमांचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकतात.

Ajay Patil