स्पेशल

विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदान कार्ड बनवा, Voter ID कार्डसाठी आता घरबसल्या अर्ज करता येणार !

Published by
Tejas B Shelar

Voter ID Card Application : भारतीय निवडणूक आयोग दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेणार असल्याची माहिती आयोगाच्या सूत्रांकडून समोर आली आहे. यामुळे सध्या संपूर्ण राज्यभर राजकारण ढवळून निघाले आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसारखीचं परिस्थिती आत्ताही पाहायला मिळत आहे.

राजकीय पक्षांच्या माध्यमातून आणि नेत्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांप्रमाणे मतदारांना देखील निवडणुकीचे वेध लागले आहे.

अशा परिस्थितीत आज आपण ज्यांनी अजूनही मतदान कार्ड तयार केलेले नसेल त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण मतदान कार्डसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा या बाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

मतदान कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करणार?

तुम्हीही अठरा वर्षाचे झाले असाल तर तुम्ही मतदार यादीत नाव नोंदवू शकतात. भारतात मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी वोटिंग आयडी कार्ड आवश्यक असते. वोटिंग आयडी कार्ड काढण्यासाठी आधी फक्त ऑफलाईन सुविधा उपलब्ध होती.

पण आता वोटिंग आयडी कार्ड साठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजेच आता घरबसल्या वोटिंग आयडी कार्ड साठी अर्ज करता येतो. यासाठी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलला भेट द्या. https://voters.eci.gov.in/ ही राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल ची वेबसाईट आहे.

नवीन वापरकर्ते असाल तर नोंदणी करा किंवा आधीपासून खाते असेल तर लॉग इन करा. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे आणि “नवीन नोंदणी” (फॉर्म ६) निवडायचा आहे. नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी तपशीलांसह फॉर्म भरायचा आहे.

आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (ओळख पुरावा, पत्ता पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो) अपलोड करायच्या आहेत. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे.

अर्ज जमा झाल्यानंतर तुम्ही तो अर्ज ऑनलाईन ट्रॅक देखील करू शकणार आहात. जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही कामाच्या वेळेत जवळच्या निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) कार्यालयाला किंवा नियुक्त बूथला भेट देऊ शकता.

तिथे गेल्यानंतर तुम्हाला फॉर्म ६ घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे भररायचा आहे. मग आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. फॉर्म आणि कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायची आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com