…..तर मतदान कार्डधारकाला जावे लागणार तुरुंगात, ‘हा’ नियम तुम्हाला माहिती आहे का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter ID Card News : भारतात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेसाठी मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, सध्या संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आगामी निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. मतदानासाठी जोरात प्रचार सुरू आहे.

अशा परिस्थितीत, आजची ही बातमी देशातील मतदान कार्डधारकांसाठी विशेष खास राहणार आहे. खरे तर देशात 19 एप्रिल पासून मतदानाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण भारतात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदान पूर्ण होणार आहे. आपल्या देशात मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. ज्या लोकांचे मतदार यादीत नाव असते त्यांना मतदार ओळखपत्र अर्थातच मतदान कार्ड दिले जाते.

हे ओळखपत्र भारतीय निवडणूक आयोग देते. हे कार्ड खऱ्या अर्थाने भारतातील नागरिकांना मतदानाचा अधिकार देते. पण कधी-कधी एक चूक मतदान कार्ड धारकाला तुरुंगात पाठवू शकते. कदाचित तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल मात्र हे खरे आहे.

यामुळे जर तुम्हीही मतदान कार्डधारक असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. आज आम्ही तुम्हाला मतदार ओळखपत्राशी संबंधित अशी माहिती देणार आहोत, जी की तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. आज आपण कोणत्या परिस्थितीत मतदान कार्डधारकाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो याविषयी माहिती पाहणार आहोत.

…तर मतदान कार्डधारकाला तुरुंगात जावे लागणार 

मतदार ओळखपत्र हे एक प्रमुख शासकीय दस्तऐवज आहे. हे दस्तऐवज अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या भारतीय नागरिकांना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. हे मतदान कार्ड निवडणुकीत मत देण्याचा अधिकार देते.

पण जर एखाद्या नागरिकाकडे 2 किंवा त्यापेक्षा जास्त मतदार ओळखपत्र असतील तर त्याला तुरुंगातही पाठवले जाऊ शकते. त्यामुळे जर तुमच्याकडेही दोन मतदान कार्ड असतील तर तुम्ही एक मतदान कार्ड भारतीय निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले पाहिजे.

म्हणजे भारतात एकापेक्षा अधिक मतदार यादीत मतदार म्हणून नोंदणी करणे बेकायदेशीर आहे. ज्याचे दोन ठिकाणच्या मतदार यादीत नाव असेल त्याला तुरुंगात सुद्धा पाठवले जाऊ शकते.

दोन मतदान कार्ड तर काय करणार

जर तुमच्याकडेही दोन ठिकाणचे दोन मतदान कार्ड असतील म्हणजेच तुमचे नाव दोन मतदार याद्यांमध्ये दिसत असेल तर तुम्ही आजच ते रद्द करू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म 7 भरावा लागेल.

तुम्ही हे ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने करू शकता. यामध्ये तुम्हाला सर्व माहिती अतिशय काळजीपूर्वक भरावी लागेल. एकदा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.