Budget 7 Seater Car:- दिवाळीला 29 तारखेपासून सुरुवात होत असून या सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक नवीन वाहन खरेदी करतात. कारण भारतामध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची एक परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून आहे.
वाहन खरेदीच्या दृष्टिकोनातून बघितले तर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते व त्यातल्या त्यात बाईक व कार खरेदीचे प्रमाण जास्त असते.
अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबाकरिता सात सीटर कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल व तुमचा बजेट सहा लाखांच्या आसपास असेल तर तुम्ही रेनॉल्ट ट्रायबर ही कार घेऊ शकतात. ही एमपीव्ही सेगमेंट मधील कार असून मोठ्या कुटुंबासाठी खूप उत्तम असा ऑप्शन आहे.
काय आहेत रेनॉल्ट ट्रायबरमध्ये देण्यात आलेली फीचर्स?
ही कार 1.0- लिटर नॅचरल एस्पीरेटेड पेट्रोल इंजिनसह येते.जे 72 पीएस पावर आणि 96 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आले आहे.
या कारमध्ये 14 इंच फ्लेक्स व्हील देण्यात आले असून यात पियानो ब्लॅक फिनिशीसह ड्युअल टोन डॅशबोर्ड, ॲपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो करिता सपोर्ट असलेली टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम,
संपूर्ण डिजिटल व्हाईट एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन स्टायलिश फॅब्रिक अपहोलस्ट्री तसेच त्यासोबत HVAC नॉब्स विथ क्रोम रिंग, ब्लॅक इनर डोअर हँडल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
किती आहे या कारचे मायलेज?
कारच्या मॅन्युअल व्हेरियंटसह 19 किलोमीटर पर लिटर पर्यंत मायलेज मिळू शकते. ही कार एकूण दहा व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. ही कार 20 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते. या कार मध्ये 84 लिटरची बूट स्पेस देण्यात आली असून याला थर्ड रो सील्ड फोल्ड करून 625 पर्यंत वाढवले जाऊ शकते.
किती आहे या कारची किंमत?
रेनॉल्ट ट्रायबर ही एक उत्तम अशी कार असून तिची किंमत पाच लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते.