Cheapest Car Loan:- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर कार खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढते व सणांच्या या शुभ मुहूर्तावर कित्येक जण आपले कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करतात. तसेच बरेच व्यक्ती हे कारलोन घेऊन कार खरेदी करत असतात. परंतु कारलोन घेताना आपल्याला घेतलेल्या लोनवर किती व्याजदर आकारला जाणार आहे हे पाहणे खूप महत्त्वाचे असते.
कारण कर्ज परतफेडमध्ये व्याजदराचा खूप मोठा प्रभाव पडत असल्याकारणाने स्वस्त व्याजदरात आपल्याला ज्या बँकेकडून कार लोन मिळेल त्या ठिकाणहुन कारलोन घेणे फायद्याचे ठरते.
त्यामुळे तुम्हाला देखील या सण उत्सवाच्या कालावधीमध्ये कारलोन घेऊन कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला कोणत्या बँकेच्या माध्यमातून सर्वात स्वस्त कर्ज मिळू शकते हे तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण कोणती बँक सर्वात स्वस्त कार लोन देते? याबद्दलची माहिती थोडक्यात बघणार आहोत.
या बँका देतात स्वस्तात कार लोन
1- युनियन बँक ऑफ इंडिया– तुम्ही जर युनियन बँक ऑफ इंडियाकडून पाच लाख रुपयांचे लोन घेतले तर तुम्हाला ते 8.7 ते 10.45% व्याजदराने मिळेल. तसेच तुम्ही पाच वर्षाच्या कालावधी करिता पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा दहा हजार तीनशे सात ते दहा हजार सातशे पस्तीस रुपये इतका ईएमआय भरावा लागेल.
2- कॅनरा बँक– कॅनरा बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही पाच लाख रुपयांचे लोन पाच वर्षांकरिता घेतले तर त्यावर तुम्हाला 8.7 टक्के ते 12.7 टक्के इतके व्याज द्यावे लागेल.
पाच वर्षाच्या कालावधीकरिता पाच लाख रुपयांच्या कर्जाकरिता तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार तीनशे सात रुपये ते 11 हजार 300 रुपये इतका ईएमआय भरावा लागेल.
3- युको बँक– युको बँकेकडून जर तुम्ही पाच लाख रुपयांचे कर्ज घेत असाल तर तुम्हाला 8.45 ते 10.55% दराने व्याज द्यावे लागेल व पाच वर्षांकरिता पाच लाख रुपयांच्या लोनसाठी तुम्हाला दरमहा दहा हजार दोनशे सव्वीस ते दहा हजार सातशे 59 रुपये ईएमआय भरावा लागेल.
4- बँक ऑफ महाराष्ट्र– बँक ऑफ महाराष्ट्राकडून तुम्ही पाच लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला 8.7 टक्के ते 13 टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागेल व पाच वर्षांकरिता जर तुम्ही पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा दहा हजार तीनशे सात ते 11 हजार 377 रुपये ईएमआय भरावा लागेल.
5- पंजाब नॅशनल बँक– पंजाब नॅशनल बँकेकडून तुम्ही पाच लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला 8.75% ते 10.6% व्याज द्यावे लागते व पाच वर्षांकरिता जर पाच लाख रुपयांचे कार लोन घेतले तर दरमहा दहा हजार 319 रुपये ते दहा हजार सातशे बहात्तर रुपये ईएमआय भरावा लागेल.