स्पेशल

25 हजारापेक्षा कमी किमतीत स्मार्टफोन घ्यायचा आहे,परंतु कोणता घ्यावा? वाचा दिलेली यादी व निवडा तुमच्या स्वप्नातला स्मार्टफोन

Published by
Ajay Patil

भारतामध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून स्मार्टफोन लॉन्च केले जातात व प्रत्येकाचे वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये आहेत. ज्यावेळी कुठलाही ग्राहक स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये सगळ्यात अगोदर विचार असतो तो म्हणजे कमीतकमी किमतीमध्ये किंवा आपल्या आर्थिक बजेटमध्ये उत्तम अशी वैशिष्ट्ये मिळतील. परंतु बाजारामध्ये शेकडो कंपन्यांचे स्मार्टफोनचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे नवीन फोन निवडण्यामध्ये खूप समस्या निर्माण होतात किंवा व्यक्ती गोंधळतो.

साधारणपणे स्मार्टफोन घेणाऱ्यांचा बजेट जर आपण सर्वसामान्यपणे पाहिला तर सरासरी 15 ते 25 हजाराच्या दरम्यान जास्त करून दिसून येतो. अशाप्रकारे जर तुम्हाला देखील स्मार्टफोन घ्यायचा असेल व तुमचा बजेट पंचवीस हजार रुपयेपेक्षा कमी असेल तर या लेखामध्ये दिलेल्या काही कमी किमतीच्या रेंजमधील उत्कृष्ट कॅमेरा फोन बद्दल आपण माहिती घेणार आहोत.

ही आहेत पंचवीस हजार रुपयेपेक्षा कमी किमतीच्या रेंजमधील स्मार्टफोन

1- टेक्नो कॅमोन 30- हा स्मार्टफोन 5000 mAh बॅटरीने सुसज्ज असून यामध्ये डुएल कॅमेरा देण्यात आलेला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि दोन मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये जो काही 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे तो ऑटो फोकस आणि f/ २.४५ आकाराच्या कॅप्चर सह येतो.

तसेच या फोनमध्ये डॉल्बी सिस्टम देण्यात आली असून आवाज उत्कृष्ट आहे. हा स्मार्टफोन धूळ आणि पाणी ला प्रतिरोधक असून या फोनचे स्टोरेज आठ जीबी आणि 256 जीबी पर्यंत असून त्याची किंमत 22999 रुपये आहे. हा फोन 23 मे रोजी लॉन्च केला गेला असून त्याची विशेष लाँच किंमत 19999 रुपये आहे.

2- वनप्लस Nord CE 4- कॅमेराच्या बाबतीत वन प्लस हा एक उत्तम पर्याय असलेला स्मार्टफोन आहे. या फोनच्या आठ जीबी व 128 जीबी व्हेरियंटची किंमत सुमारे 24 हजार 999 रुपये असून या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा ऑप्शन देण्यात आला आहे. याचा पहिला कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा सोनी प्राथमिक सेंसर आहे तर दुसरा कॅमेरा आठ मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड अँगल लेंससह येतो व याचा सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन 6.7 इंचाची आहे.

3- रेडमी नोट 13 प्रो- हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो व यामध्ये दोनशे मेगापिक्सल चा प्राथमिक कॅमेरा, आठ मेगापिक्सलचा अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा आणि दोन मेगापिक्सेलचा मेक्रो शूटर कॅमेरा देण्यात आला आहे. 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे व या फोनचा डिस्प्ले 6.7 इंचाचा असून तो गोरिल्ला ग्लासने बनवण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 5100 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून जर तुम्ही ॲमेझॉन वरून या फोनची खरेदी केली तर याच्या आठ ते १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत 24999 रुपये आहे.

4- रियलमी 12 प्रो- रियलमीचा हा स्मार्टफोन क्वालकाम स्नॅपड्रॅगन चीफ सेट वर चालतो व हा ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. या स्मार्टफोनचा प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असून जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनने सुसज्ज आहे. सेकंडरी कॅमेरा 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्सचा आहे तर तिसरा कॅमेरा आठ मेगापिक्सल आहे. सोळा मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे व या स्मार्टफोनची बॅटरी 5000 mAh क्षमतेची असून तो 28 मिनिटांमध्ये पूर्णपणे चार्ज होऊ शकतो. या स्मार्टफोनची स्क्रीन 6.7 इंचाची आहे. या स्मार्टफोनच्या आठ ते 128 जीबी मॉडेल ची किंमत जवळपास 21 हजार 999 रुपये आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil