स्पेशल

फॉरेनमध्ये कार चालवायचीये ? आरटीओमध्ये ‘अशा’ पद्धतीने काढा आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसेन्स

Published by
Ahmednagarlive24 Office

सध्या प्रदेशात जाण्याचा, तेथे नोकरी, शिक्षण, व्यवसाय करण्याचा ट्रेंड वाढला आहे. बऱ्याचवेळा शिक्षणानिमित्त असो किंवा फिरायला असो पण परदेशात गेल्यानंतर तिथे लायसेन्स नसल्याने वाहन चालविता येत नाही. जर तुम्हालाही आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे आले तर अगदी सोप्या पद्धतीने हे शक्य होते.

भारतातच म्हणजे आपल्या शहरातच आरटीओमध्ये तुम्ही हे लायसन्स काढू शकता. तुम्ही भारतीय आहात व तुमच्याकडे येथील लायसेन्स असले तरी देखील विदेशात वाहन चालविण्यासाठी तुम्हाला अटकाव केला जातो.

त्यामुळे तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसेन्स आवश्यक आहे. त्यामुळे परदेशात शिक्षणासाठी किंवा इतर कारणास्तव जाणाऱ्यांमध्ये हे लायसेन्स काढण्यासाठी गरज असते. तुम्हाला माहित आहे का की या लायसेन्ससाठी कोणतीही चाचणी द्यावी लागत नाही, हो हे खरे आहे. चला जाणून घेऊयात हे लायसन्स काढण्याची पद्धत.

कसे काढावे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसेन्स?

सर्वात प्रथम तुम्हाला आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. हा अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्र घेऊन आरटीओ कार्यालयात सहायक प्रादेशिक परिहवन अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष हजर राहून तुमच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर तुम्हाला आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसेन्स दिले जाते.

हे लायसेन्ससाठी एक हजार रुपये शुल्क असून ऑनलाइन अर्ज करतानाच हे शुल्क तुम्हाला भरावे लागते. जर हे लायसन्सं काढण्याची सरासरी एक अंदाजित आकडेवारी जर पाहिली तर आरटीओ कार्यालयात महिन्याला २ ते ३ तर वर्षभरात जवळपास २५ जण आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसेन्स काढत असतील असा एक अंदाज आहे.

  • ही लागतील कागदपत्रे

  • आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी कोणती कागदपत्रे लागतील. तर यासाठी तुम्हाला अर्जदाराचे लायसेन्स, पासपोर्ट, व्हिसा, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रे लागतील.
Ahmednagarlive24 Office