Success story : आज दुचाकी सेक्टर वेगाने विकसित होत आहे. आज दुचाकी म्हटलं की पाहिलं नाव समोर येत ते म्हणजे TVS. या कंपनीच्या बाईक्स अक्षरशः प्रचंड लोकप्रिय आहेत. आज कंपनीच्या विविध बाईक मार्केट मध्ये एकदम धुमाकूळ घालत आहेत.
Apache RTR याचेच एक उदाहरण आहे. तुम्हाला विशेष वाटेल पण बाइक्समध्ये एबीएस तंत्रज्ञान भारतात प्रथम TVS ने आणलं आहे. आज TVS च्या स्कुटी तर महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. टीव्हीएस मोटर्स ही भारतातील तिसरी सर्वात मोठी
दुचाकी कंपनी आहे. पण ही कंपनी येथे पोहोचली कशी? या कंपनीची सुरवात कशी झाली ? याचे मागे ही कंपनी सुरु करण्याची मोठी संघर्षगाथा आहे. चला जाणून घेऊयात –
* टीव्ही सुंदरम अय्यंगार यांविषयी थोडेसे
अनेकांना TVS नाव ऐकले की, ही कंपनी परदेशी आहे असे वाटते. परंतु तसे नाही. TVS हे दक्षिण भारतातील एका सामान्य कुटुंबातील मुलाच्या जिद्दीचं फळ आहे. त्याच नाव टीव्ही सुंदरम अय्यंगार. टीव्ही सुंदरम अय्यंगार यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला होता.
त्यांनी वकील व्हावं ही वडिलांची इच्छा. त्यानुसार टीव्ही सुंदरम अय्यंगार यांनी अभ्यासही केला. पुढे त्यांनी काही दिवस रेल्वेत नोकरीही केली. नंतर पुन्हा बँकेतही काम केलं. परंतु त्यांचे मन नोकरीत रमले नाही. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
परंतु त्यावेळी इंग्रज राजवट होती. नोकरी सोडून व्यवसाय करणं म्हणजे अगदीच धोक्याचं काम होत. परंतु सर्व समस्यांकडे दुर्लक्ष करून 1911 मध्ये, टीव्ही सुंदरम अय्यंगार यांनी दक्षिण भारतातील पहिली बस सेवा तामिळनाडूमध्ये टीव्ही सुंदरम अय्यंगार अँड सन्स या नावाने सुरू केली. येथून त्यांच्या व्यावसायिक प्रवास सुरु झाला.
* अशी झाली TVS ची सुरवात
टीव्ही सुंदरम अय्यंगार यांनी सुरु केलेली ही बस सेवा खूप लोकप्रिय झाली. लोकांनी बससेवा अक्षरशः उचलून धरली. आता त्यांनी आणखी पुढे पाऊल टाकायचे ठरवले. 1919 साली त्यांनी उत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी मद्रास ऑटो सर्व्हिस लिमिटेड ही कंपनी सुरु केली.
याअंतर्गत सेल्स अँड सर्व्हिस सह स्पेअर पार्ट्सचे बनवण्याचे काम सुरु झाले. काही वर्षांतच त्यांना जनरल मोटर्सची डीलरशिपही मिळाली. 1950 च्या दशकात जनरल मोटर्सचा सर्वात मोठा वितरक म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
अय्यंगार यांनी आवड म्हणून सुरू केलेल्या व्यवसायाने उत्तरोत्तर प्रगती केली. टी.व्ही.सुंदरम अय्यांगार यांचे 28 एप्रिल 1955 रोजी मद्रास प्रांतात निधन झाले. पुढे त्यांच्या वारसांनी या व्यसनाला व्यापक स्वरुप दिलं. आज तुमच्या आमच्यासमोर TVS कंपनीचं विस्तृत जाळं निर्माण झालं आहे.