स्पेशल

Waterfalls In Maharashtra: ‘या’ धबधब्यापुढे गुरुत्वाकर्षणाचा नियम ठरतो फेल! पाणी वाहते वरच्या दिशेने, पावसाळ्यात द्या भेट

Published by
Ajay Patil

Waterfalls In Maharashtra:- महाराष्ट्रामध्ये अनेक निसर्गसौंदर्याने  नटलेली आणि सुंदरतेने बहरलेली अशी अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळे असून पावसाळ्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आणखीनच सौंदर्य खुलते व जिकडेतिकडे हिरवीगार गवताने जणू चादर पांघरलेली पृथ्वी आपले डोळे दिपवून टाकते.

त्यामुळे बरेच पर्यटक हे पावसाळ्यामध्ये विविध ठिकाणी भेटी देत असतात. यामध्ये प्रामुख्याने हिल स्टेशन तसेच धबधबे, ट्रेकिंग पॉईंट्स तसेच गडकिल्ल्यांना भेटी देण्यास जास्त प्राधान्यक्रम देण्यात येतो. परंतु पावसाळ्यामध्ये खरी मजा येते ती धबधबे पाहण्यामध्ये. महाराष्ट्रमध्ये अनेक धबधबे आहेत व त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये व सुंदरता देखील वेगवेगळी आहे.

परंतु महाराष्ट्र मध्ये असा एक धबधबा आहे की, तो एक रहस्यमयी असून त्याने गुरुत्वाकर्षणाचा नियमच फेल ठरवलेला आहे. प्रामुख्याने या नियमानुसार कुठली वस्तू वरच्या दिशेने फेकली तर ती खाली येतेच.

धबधब्यांच्या बाबतीत देखील पाणी वरून खाली पडते. परंतु या धबधब्याचे पाणी जमिनीच्या दिशेने न वाहता  आकाशाच्या दिशेने वाहते. विशेष म्हणजे हा धबधबा हवेच्या दाबामुळे असा उलटा वाहायला लागतो. याठिकाणी तुम्ही गेलात तर डोंगर कपारीवर उभे राहून मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटू शकतात.

कोकणकडा नाणेघाट धबधबा आहे निसर्गाची समृद्ध खाण

नाणेघाट धबधबा हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा धबधबा असून ते एक लोकप्रिय असे पर्यटन स्थळ देखील आहे व या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. या धबधब्याचे सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उंचावरून खाली कोसळणारे पाणी वाऱ्याच्या प्रवाहाने जमिनीवरनं न पडता थेट उलट्या आकाशाच्या दिशेने वरती फेकले जाते.

तसेच नाणेघाट धबधब्याचा जो काही परिसर आहे तो पावसाळ्यामध्ये नेहमी धुक्यात हरवलेला असतो व त्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य हे पर्यटकांसाठी खूपच सुखद अनुभव देणारी ठरते. नाणेघाट धबधबा हा पुण्यातील जुन्नर जवळ महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये असून तुम्हाला जर मुंबईवरून यायचे असेल तर तुम्हाला तीन तासाच्या प्रवास करून या ठिकाणी पोहोचता येते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे हा जुन्नर तालुक्यातील दुर्गवाडी कोकणकडा परिसरामध्ये असून याला रिवर्स वॉटर फॉल म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जर तुमची कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत कुठे ट्रीप प्लान करायची

आणि एखाद्या निसर्गाने समृद्ध आणि सुंदरतेने नटलेल्या ठिकाणी भेट द्यायची इच्छा असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला धबधबा पहायचा असेल तर तुम्ही जुन्नरजवळील नाणेघाट धबधबा म्हणजेच रिव्हर्स वॉटर फॉलचा पर्याय निवडू शकता व पावसाळ्यामध्ये निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil