स्पेशल

नागरिकांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस पडणार; पण ‘या’ जिल्ह्यात पाऊस घेणार विश्रांती, पहा IMDचा अंदाज

Published by
Ajay Patil

Weather Update : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. वास्तविक गेल्या बारा ते तेरा दिवसांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपिट होत आहे. अवकाळी पावसाने अक्षरशः त्राहीमाम माजवला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा हे पीक पूर्णतः वाया गेले असून आता काढणी होत असलेला कांदा देखील यामुळे खराब झाला आहे. काल नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे या गावात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली यासोबतच तालुक्यातील अंबासन बिजोरसे परिसरात देखग गारपिटीची नोंद झाली आहे.

हे पण वाचा :- कर्मचाऱ्यांनो यापुढे संपात उतरला तर याद राखा! राज्य शासन करणार ‘ही’ कारवाई, पहा…

याव्यतिरिक्त मालेगाव तालुक्यातील कोठरे या गावातही मुसळधार पावसाची नोंद काल झाली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यातील काही भागातही गारपीटीची नोंद झाली आहे. दरम्यान, विदर्भ आणि कोकणातील शेतकऱ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी येणारे दोन दिवस दिलासादायक राहणार आहेत.

हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भ आणि कोकणात 16 आणि 17 तारखेला म्हणजेच आज आणि उद्या पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र मध्य महाराष्ट्रमधील 10 जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम असल्याचे मत तज्ञांच्या माध्यमातून वर्तवले जात आहे. शिवाय कोकणात आणि विदर्भात देखील 18 तारखेपासून पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

हे पण वाचा :- पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धुळे अन ‘या’ जिल्ह्यात पुढील 4 ते 5 तासात कोसळणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाचा इशारा

जवळपास राज्यात 23 एप्रिल पर्यंत पावसाची परिस्थिती कायम राहणार आहे. 23 एप्रिल पर्यंत मध्य महाराष्ट्र विदर्भ कोकण आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र तज्ञांनी या काळात पडणारा पाऊस हा आतापर्यंत जसा पडला आहे तसा पडणार नाही असे देखील स्पष्ट केला आहे. म्हणजेच पावसाची तीव्रता कुठेतरी कमी होईल असा अंदाज तज्ञांचा आहे.

निश्चितच पावसाची तीव्रता कमी होणारी असली तरी देखील अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आत्ताच नुकसान करून गेला आहे. दरम्यान 23 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे यामुळे शेतकऱ्यांचे आणखीनच नुकसान होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झाली चांदी ! ‘या’ स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मिळालेत 1 कोटी 60 लाख, पहा….

Ajay Patil