Weather Update : राज्यात 30 आणि 31 मार्च रोजी बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. प्रामुख्याने विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात देखील पाऊस होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ वगळता जवळपास संपूर्ण राज्यात हवामान कोरड आहे.
काही जिल्ह्यात मात्र ढगाळ हवामान होते तर काही जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सऱ्या कोसळल्या परंतु पाऊस सर्वत्र पडला नाही. दरम्यान आता तीन आणि चार एप्रिल रोजी काही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडी अर्थातच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! ‘या’ प्रकल्पामुळे ठाणे ते डोंबिवली प्रवास फक्त 20 मिनिटात होणार; ‘या’ वेळी होणार उद्घाटन,…
कोणत्या राज्यात पडणार पाऊस?
उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तर पश्चिम भारतातील बहुतांशी राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तीन आणि चार एप्रिल रोजी या संबंधित राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची शक्यता कायमच राहणार आहे.
दरम्यान, आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये हलका पाऊस बरसण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगाना, दक्षिण कर्नाटक, राजस्थान तामिळनाडू आणि केरळ या राज्यातही पावसाची शक्यता आहे. राजस्थान मध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. निश्चितच यामुळे या संबंधित राज्यातील शेतकऱ्यांची आता डोकेदुखी वाढणार आहे.
हे पण वाचा :- राजधानी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात निघाली मोठी भरती; पहा भरतीची सविस्तर माहिती
पुढील दोन दिवस या राज्यात पावसाची आणि गारपीटीची शक्यता लक्षात घेता तेथील शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेणे अपरिहार्य आहे. महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. 5 एप्रिलनंतर या संबंधित राज्यातही हवामान कोरडे राहणार आहे. परंतु राज्यातील काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे मत तज्ञांकडून वर्तवल जात आहे. एकंदरीत आता राज्यात आता काही दिवस प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार आहे.
मात्र काही भागात स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडेल असा अंदाज आहे. दरम्यान मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात आतून नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून आता नुकसान भरपाईची मागणी होत असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केली जाईल असं शासनाच्या माध्यमातून सांगितलं गेल आहे.
हे पण वाचा :- संभाजीनगरच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! गव्हाच्या शेतीतून मिळवलं तब्बल 76 क्विंटलच हेक्टरी उत्पादन, पहा असं काय केलं?