Weather Update : भारतातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्यापासून राज्यात अधुमधून अवकाळी पाऊस होत आहे. काही भागात तर गारपीट देखील झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या चालू महिन्यात मात्र गारपीटीची तीव्रता अधिक आहे.
या चालू महिन्यात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात गारपीट झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हे पण वाचा :- ठाणेकरांना लवकरच मिळणार गिफ्ट ! ‘या’ तीन मार्गांवर सुरु होणार एसी लोकल; रूटची माहिती इथं वाचा
विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील चार दिवस पाऊस पडणार आहे. यामुळे निश्चितच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अधिक सजग आणि सतर्क राहावे लागणार आहे. आधीच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आता शेतकरी बांधव कांदा तसेच हळद आणि इतर अन्य पिकांची काढणी करत आहेत. अशातच हवामानात बिघाड झाला असल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना निश्चितच काळजी घ्यावी लागणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 24 एप्रिल ते 27 एप्रिल पर्यंत मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी वारा आणि पावसाची शक्यता राहणार आहे.
सदर हवामान अंदाजानुसार 24 अन 25 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव, बीड आणि परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे. 26 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! महाराष्ट्रासाठी पुढील चार ते पाच दिवस येलो अलर्ट; ‘या’ भागात होणार गारपीट, IMD चा अलर्ट
27 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये पावसाची शक्यता कायम राहू शकते असा अंदाज वनाकृ विद्यापीठाच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
निश्चितच या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि सामान्य जनतेने वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याने सतर्क राहायचे आहे. शेतकऱ्यांनी या कालावधीमध्ये आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधायचे आहे. तसेच काढणी केलेला शेतमाल देखील सुरक्षित ठिकाणी हलवणे गरजेचे आहे.
हे पण वाचा :- पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी बँकेत मोठी भरती, ‘ही’ पदे भरली जाणार; वाचा सविस्तर