Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस कोसळत आहे. बहुतांशी जिल्ह्यात तर गारपीट देखील होत आहे. पुणे अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार नासिक यांसारख्या बहुतांशी जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी यांसारख्या जिल्ह्यातही काही भागात गारपीट झाली असल्याचे सांगितले गेले. विदर्भात देखील गारपिटीने आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे. दरम्यान राज्यात पुन्हा पुढील चार ते पाच दिवसासाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी बँकेत मोठी भरती, ‘ही’ पदे भरली जाणार; वाचा सविस्तर
उत्तर पाकिस्तान आणि पंजाब च्या जवळील मध्य भागांवर वेस्टर्न डिस्टर्ब्न्स तयार झाल्यामुळे चक्रीय वादळ आणि वारे मध्य प्रदेश पासून चेन्नई पर्यंत खालच्या स्तरावर वाहत आहेत. यामुळे महाराष्ट्रात ही परिस्थिती तयार होत असून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
याबाबत पुणे वेधशाळेने माहिती दिली आहे. दरम्यान जेष्ठ हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात मेघगर्जनेसह विजा आणि जोरदार वारे वाहणार आहेत.
हे पण वाचा :- युवा शेतकऱ्याचा वांग्याच्या शेतीतला हटके प्रयोग; ‘या’ जातीच्या वांगी लागवडीतून मिळवले एकरी आठ लाखांचे उत्पन्न, पहा….
तसेच जोरदार अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच उद्या विदर्भातील काही भागात गारपीट देखील होईल असं होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
यामध्ये मध्ये महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता अधिक असून या संबंधित विभागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा सतर्क आणि सजग राहणे अपेक्षित आहे.
हे पण वाचा :- अरे बापरे! भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा; उद्यापासून ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस !