स्पेशल

Wedding Card Tips: लग्नपत्रिका छापायची आहे का? तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी! वाचा काय म्हणते ज्योतिषशास्त्र?

Published by
Ajay Patil

Wedding Card Tips:- सध्या लग्न समारंभाचे दिवस असून मोठ्या प्रमाणावर यावर्षी लग्नाचे मुहूर्त देखील असल्यामुळे बऱ्याच कुटुंबांमध्ये मुला मुलींचे लग्नाचे बार उडवले जाण्याची शक्यता आहे. आपल्याला माहित आहे की ज्या कुटुंबामध्ये लग्न असते त्या ठिकाणी लग्नाच्या नियोजनाची खूप लगबग सुरू असते.

त्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने आणि बारकाईने नियोजन प्रत्येक जण करत असतात. लग्न हा समारंभ जसा दोन मन जुळवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहेच परंतु दोन कुटुंबे देखील या लग्नामुळे एकमेकांच्या जवळ येत असतात. तसेच हा संपूर्ण आयुष्याशी निगडित असणारा प्रश्न असल्यामुळे लग्नाच्या संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टी अगदी विधीवत व मुहूर्तानुसार पार पाडल्या जातात.

या सगळ्या नियोजनामध्ये नातेवाईकांना आपण लग्नाचे आमंत्रण देत असतो व त्यामध्ये लग्नपत्रिका खूप महत्त्वाची असते. परंतु ज्योतिष शास्त्राच्या मते लग्नपत्रिकेशी संबंधित काही वास्तू नियम असतात व त्यांचे पालन करणे देखील खूप गरजेचे असते. ज्योतिषशास्त्राच्या मते लग्नपत्रिका कशी असावी?

या गोष्टीला देखील तितकेच महत्त्व आहे. लग्नपत्रिकेमध्ये वास्तुशी संबंधित काही चूक झाली तर आपण लग्नपत्रिका प्रथम गणेशाला अर्पण करत असतो व या वास्तु संबंधित चुकीमुळे ती गणेशाला मान्य होत नाही असे देखील प्रसिद्ध ज्योतिषांचे मत आहे.

 लग्नपत्रिका नेमकी कशी असावी?

1- पत्रिकेवरील गणेशाचे स्थान जर आपण वास्तुशास्त्रानुसार पाहिले तर लग्नपत्रिकेवर गणेशजींचा फोटो चुकून देखील लावू नका. कारण लग्न झाल्यानंतर बऱ्याचदा लग्न पत्रिका कचऱ्यामध्ये फेकले जातात किंवा कुठेतरी त्या ठेवले जातात. अशा परिस्थितीत त्यावर श्री गणेशाचा फोटो असणे म्हणजे हा गणेशाचा अपमान आहे असे म्हटले जाते.

2- लग्न पत्रिकेचा आकार – लग्नपत्रिका छापताना ती त्रिकोणी किंवा पानांच्या आकारात कधीही नसावी. ज्योतिष शास्त्राच्या मते त्रिकोणाच्या आकाराचे लग्न पत्रिका ही नकारात्मकतेला आकर्षित करते तर पानाच्या आकाराचे लग्न पत्रिका शुभ मानले जात नाही. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या लग्न पत्रिकेचा आकार चौकोनी असतो तो सर्वात शुभ मानला जातो. कारण चौकोनी आकाराच्या लग्नपत्रिकेवर चारही कोपऱ्यावर सुख, समृद्धी, शांती आणि सौभाग्याचा वास असतो.

3- वधूवरांचे फोटो असावेत का?- बऱ्याचदा आता आपल्याला ट्रेंड दिसून येतो की लग्नपत्रिकेवर नवरदेव नवरीचे म्हणजेच वधू-वरांचे फोटो असतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार लग्नपत्रिका वर वधू-वरांचे फोटो लावू नयेत. याच्यामध्ये कारण म्हणजे वधू वरांची चित्रे काढणे किंवा वधू-वरांचे प्रतीक बनवणे यामुळे वाईट नजरेचा धोका संभवतो व जोडी एकमेकांना पाहू शकते. त्यामुळे चुकून देखील लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे फोटो लावू नये.

4- लग्न पत्रिकेचा रंग कसा असावा?- लग्न पत्रिकेचा रंगाला देखील यामध्ये महत्त्व असून लग्नपत्रिका काळ्या किंवा तपकिरी रंगाची नसावी. पिवळ्या रंगाची लग्नपत्रिका असेल तर ती शुभ मानली जाते. त्यासोबतच लाल रंगाची लग्नपत्रिका देखील चांगली मानली जाते. लग्नपत्रिकेतील कागद हा सुगंधित वापरावा किंवा लग्नपत्रिकेत सुगंध जोडावा.

अशा पद्धतीने ज्योतिष शास्त्रानुसार लग्नपत्रिके संबंधी काही महत्त्वाचे नियम आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil