अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन तंत्रज्ञान अवलंबत आहेत. आता यात व्होडाफोन-आयडियाने आपले पुढचे पाऊल टाकले आहे.
‘ह्या’कंपनीने ई -सिम सर्व्हिस आणली असून आता आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणत्याही कंपनीचे सीमकार्ड न घातल्याशिवाय त्या कंपनीची सेवा वापरता येणार आहे.
सध्या मुंबई, दिल्ली आणि गुजरातमधील पोस्टपेड युजर्ससाठी ही सुविधा देण्यात आली आहे. जगभरात आता अनेक कंपन्यांनी ई -सिम सव्र्हिस आणली असून
व्होडाफोन-आयडियाने देशात प्रथमच पोस्ट पेड युजर्संसाठी ई-सव्र्हीस बाजारात आणली आहे. अॅपल फोनसह काही मोजक्या फोनमध्येच या ई-सिमचा वापर करता येऊ शकणार आहे.
हार्ड अँड डिव्हाईसेज मध्ये ई -सिम सर्व्हिस देण्यात आली आहे. एक इंटिग्रेटेड सिम चिप म्हणून काम करणार आहे. यासाठी वेगळे सीमकार्ड घेण्याची गरज नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com