स्पेशल

काय सांगता ! पोपट दे तरच घटस्फोट देणार…; पुण्यातील प्रकरणाची संपूर्ण देशात रंगली चर्चा, काय आहे प्रकरण

Published by
Ahmednagarlive24 Office

Pune Viral News : भूतदया असणे ही एक चांगली बाब आहे. अनेकांचे पशुपक्ष्यांवर खूपच प्रेम असते. आपले संस्कृती देखील पशुपक्ष्यांवर प्रेम करावे असे शिकवते. मात्र पशुपक्ष्यांवर प्रेम असले तरीही या प्रेमालाही काही मर्यादा असतात. जर तुमचेही पशुपक्ष्यांवर प्रेम असेल तर तुम्ही पशुपक्ष्यांचा योग्य पद्धतीने सांभाळ कराल. त्यांना घरातील सदस्य प्रमाणेच वागणूक द्याल.

मात्र पुण्यात असे एक प्रकरण समोर आले आहे ज्याने सर्वच चकित झाले आहेत. पुण्यात चक्क एका पक्षाच्या ताब्यासाठी घटस्फोटाचे प्रकरण गेले काही महिने प्रलंबित राहिले आहे. पुण्यातील शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयातून हे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये पतीने पत्नीला पोपटाचा ताबा दे तरच घटस्फोट देणार असे सांगितले होते आणि यामुळेचं सध्या या प्रकरणाची संपूर्ण महाराष्ट्रभर मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान आता आपण हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे हे पाहणार आहोत.

काय होत प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात पत्नीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाच्या माध्यमातून समुपदेशन देण्यात आले. यात पतीने सुद्धा पत्नीला घटस्फोट देण्याचे मान्य केले. यासाठी सर्व अटी आणि शर्ती मान्य झाल्यात. मात्र, पतीला पत्नीकडे असलेल्या पोपटाचा ताबा हवा होता. त्यामुळे हे प्रकरण गेले काही महिने प्रलंबित होते.

नंतर मात्र पत्नीने पोपटाचा ताबा पतीला देण्याचे मान्य केले आणि त्यानंतर मग शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाचा हा दावा मंजूर केला आहे. या दांपत्याने डिसेंबर 2019 मध्ये रेशीम गाठ बांधली होती. मात्र या दाम्पत्यात अवघ्या काही वर्षांच्या काळातच दुरावा निर्माण झाला आणि हे दांपत्य 2021 पासून वेगवेगळे राहू लागले.

नातेवाईकांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा संसार सुखाने सुरू राहावा म्हणून प्रयत्न केलेत. पण या दोघांना सोबत राहण्यात रस उरला नव्हता. यामुळे पत्नीने डिसेंबर 2022 मध्ये घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. यानंतर पतीनेही घटस्फोटासाठी तयारी दाखवली. पत्नीने पोटगी नाकारली. पती विरोधात दिवाणी अथवा फौजदारी दावा दाखल न करण्याचे मान्य केले.

तसेच एकमेकांच्या मालमत्तेवर कोणताच दावा करणार नाहीत असे देखील मान्य करण्यात आले. मात्र, पतीने पत्नीकडे असलेला आफ्रिकन पोपट परत करण्याची मागणी केली. पत्नीने ही मागणी मान्य केल्यानंतर मग घटस्फोटाचा दावा मंजूर झाला असून या दाम्पत्याचा आता घटस्फोट झाला आहे.

Ahmednagarlive24 Office