स्पेशल

काय आहे नेमका ओला बॉस सेल? इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर मिळेल 25 हजार रुपयांची सूट! वाचा संपूर्ण माहिती

Published by
Ajay Patil

भारतामध्ये साधारणपणे गणेश चतुर्थी पासून सणांचा कालावधी सुरू होतो व लागोपाठ सण येतात व यामध्ये आता नवरात्री उत्सवाला मोठ्या धामधुमीत सुरुवात झालेली आहे. देवीच्या भक्तीमय वातावरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत भक्तीमय वातावरण तल्लीन झालेला असून या भक्तीमय वातावरणामध्ये आता मोठ्या प्रमाणावर वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून वाहन खरेदीवर ऑफर देण्यात येत आहेत.

अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील या सणासुदीच्या कालावधीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर देशातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी ओलाच्या माध्यमातून बिग बॉस सेलची सुरुवात करण्यात आलेली असून याबद्दलची माहिती कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिलेली आहे. त्यांनी याबद्दल  X अकाउंट वर पोस्ट केले असून मध्ये त्यांनी या सेलच्या माध्यमातून मिळणाऱ्या ऑफर सांगितले आहेत.

 काय आहे ओला इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनीचा बॉस सेल?

कंपनीच्या माध्यमातून बॉस सेलची सुरुवात 3 ऑक्टोबर पासून करण्यात आली असून या विक्रीला सर्वात मोठा ओला सीजन सेल म्हणून घोषित करण्यात आले आहे.या सेलमध्ये जर तुम्ही एन्ट्री लेवल S1 एक्स ईव्ही स्कूटर खरेदी केली तर ती तुम्हाला 49 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. म्हणजे मूळ किमतीच्या सुमारे 25 हजार रुपयांची सूट या स्कूटरवर मिळत आहे.

हे एक सवलतीचे पॅकेज असून संपूर्ण पॅकेजमध्ये या स्कूटरच्या रेंजमध्ये दहा हजार रुपयांच्या सवलतीचा देखील समावेश आहे. त्यासोबत स्मार्ट टेक मध्ये प्रवेश व एक्सचेंज बोनस, आठ वर्षाची वारंटी आणि जलद चार्जिंग साठी क्रेडिट यांचा देखील समावेश यामध्ये असणार आहे.

 ओला इलेक्ट्रिकल कंपनी ऑफर करत आहे रेफरल प्रोग्राम

ओला इलेक्ट्रिक एक रेफरल प्रोग्राम ऑफर करत असून यामध्ये S1 स्कूटरचा मालक ओला ईव्ही खरेदी करण्यासाठी त्याचा मित्राला रेफर करू शकतो आणि त्या बदल्यात त्याला तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत व जो नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार असेल त्याला दोन हजार रुपयांची सूट मिळणार आहे.

त्यासोबतच टॉप 100 रेफरिंग कम्युनिटी मेंबर्सना 11 लाख 11 हजार 111 रुपयांचा रिवार्ड दिला जाणार आहे. गेल्या काही दिवसापासून कंपनीच्या विक्रीमध्ये घट झाल्यामुळे कंपनीने आता विक्री वाढवण्यासाठी हे पर्याय अवलंबले आहेत.

Ajay Patil