General Knowledge : पृथ्वी सूर्याभोवती फिरताना स्वतःभोवतीही आपल्या अक्षावर फिरते, त्यामुळे दिवस आणि रात्रीचे कालचक्र चालते आणि त्यामुळे पृथ्वीवर जीवनाची भरभराट होण्यासही मदत होते.
हे परिभ्रमण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तींवरही परिणाम करते आणि सागरी प्रवाहांपासून वातावरणातील अभिसरणापर्यंत सर्वकाही आकारास येते.

मात्र हा स्वतःभोवती फिरणारा आपला ग्रह एका सेकंदासाठीही फिरणे थांबला तर ? काय होईल हा एक काल्पनिक प्रश्न असला तरी तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. याच विषयावर ‘द कोअर’ हा हॉलीवूड चित्रपटही तयार झाला आहे.
पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे एक हजार मैल प्रतितास या वेगाने फिरते. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २३ तास ५६ मिनिटे आणि ४.१ सेकंद लागतात. त्यामुळेच पृथ्वीच्या एका भागात दिवस आणि दुसऱ्या भागात रात्र असते.
मात्र पृथ्वीचे फिरणे थांबले तर दिवस आणि रात्र यावर परिणाम होईल आणि त्यासोबतच आपल्या ग्रहावर एक भयावह परिस्थिती दिसेल, त्याची कल्पनाही करणे शक्य नाही.
भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यापासून कंपने जाणवत नाहीत, तोपर्यंत पृथ्वीखालील हालचाली जाणवू शकत नाहीत. मात्र एका नवीन अभ्यासात पृथ्वीच्या आतील गाभ्याने फिरणे बंद केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याने आपल्या प्रवासाची दिशाही बदलली आहे.
चीनच्या पेकिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार २००९ च्या आसपास पृथ्वीच्या आतील गाभा फिरणे थांबले आणि त्याच्या फिरण्याची दिशा बदलली.
यावरून पृथ्वी पृष्ठभागाच्या सापेक्ष, पुढे-मागे, चकत्यासारखी फिरत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला असून पृथ्वीच्या स्विगचे चक्र सुमारे सात दशकांचे आहे. याचा अर्थ अंदाजे दर ३५ वर्षांनी त्याची दिशा बदलते.
पेकिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, ७० च्या दशकाच्या सुरुवातीला पृथ्वीच्या फिरण्याच्या दिशेत बदल झाला होता. आता पुन्हा २०४० च्या मध्यात तिची फिरण्याची दिशा बदलेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता.
पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते, पण आपल्याला ते जाणवत नाही. कारण आपणही तिच्यासोबत फिरतो. पृथ्वीच्या परिभ्रमणावर अनेक संशोधने झाली आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
एका अहवालानुसार, जर पृथ्वी फिरणे थांबले तर पृथ्वीवर होलोकॉस्टसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे, पृथ्वीच्या अर्ध्या भागात जास्त उष्णता आणि उरलेल्या अर्ध्या भागात हिवाळा असेल.
त्यामुळे सजीवांवर विपरीत परिणाम होऊन त्याची तीव्रता भयंकर होईल. ही घटना घडल्यास सर्वांचाच मृत्यू होण्याची शक्यताही काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. जर पृथ्वीचे फिरणे थांबले तर ते आपल्या ग्रहासाठी विनाशकारी असेल.
विषुववृत्तावर पृथ्वीचे फिरणे सर्वात वेगवान म्हणजे सुमारे एक हजार मैल प्रतितास आहे. हा वेग अचानक थांबला ही घटना तर खडक आणि महासागरांचा थरकाप होऊन भूकंप आणि सुनामीला कारणीभूत ठरेल.
इतकेच नाही तर लोकांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची असंवेदनशीलताही जाणवू शकते. रोटेशन थांबल्यामुळे काहीही सुरक्षित राहणार नाही. वृक्षही मुळापासून उन्मळून पडतील.
दरम्यान, असे झाले तर पृथ्वीवरील सर्व लोक मारले जातील आणि तो पृथ्वीसाठी सर्वात वाईट दिवस असेल, अशी भीती खगोल भौतिक शास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन यांनी व्यक्त केली आहे.