स्पेशल

विमानाचं मायलेज नेमकं किती असत बरं ? वाचा ‘हि’ रंजक माहिती..

Published by
Sushant Kulkarni

१६ जानेवारी २०२५ : विमानाची उड्डाणं सतत सुरू असतात.विमान प्रवासामुळे वेळेची बचत होत असली तरी इंधनाचा खूप वापर होतो.चारचाकी गाडी घेताना आपण तिचं मायलेज बघतो.गाडीत एक लीटर पेट्रोल किंवा डिझेल भरल्यानंतर ती किती किलोमीटर धावते यावर बरंच काही अवलंबून असतं.अशा परिस्थितीत एक लीटर इंधन भरल्यानंतर विमान किती अंतर कापू शकतं, हा विचार तुमच्या डोक्यात कधी आला आहे का ? विमानाच्या मायलेजबाबत जाणून घेणं रंजक ठरेल.

उड्डाण केल्यानंतर विमान एका सेकंदात साधारण चार लीटर इंधन खर्च करतं. ‘बोईंग ७४७’ या विमानाला मिनिटभराच्या प्रवासासाठी २४० लीटर इंधन लागतं. बोईंगच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

त्यानुसार ‘बोईंग ७४७’ ला दहा तासांच्या प्रवासासाठी तब्बल ३६ हजार गॅलन म्हणजे १,५०,००० लीटर इंधन लागतं.एक मैल अंतरासाठी या विमानाला साधारण पाच गॅलन इंधन लागतं.म्हणजे प्रति किलोमीटर अंतर कापण्यासाठी ‘बोईंग ७४७’ ला १२ लीटर इंधन लागतं.

या विमानातून एकाच वेळी ५०० प्रवासी प्रवास करतात,म्हणजे १२ लीटर इंधन भरल्यानंतर एवढे प्रवासी एक किलोमीटर अंतर पार करतात.म्हणजे हे विमान एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी प्रत्येक व्यक्तीवर ०.०२४ लीटर इंधन खर्च करतं.मायलेजबाबत बोलायचं तर हे विमान एक लीटर इंधनात ०.८ किलोमीटर अंतर कापतं,हे अंतर अर्थातच खूप कमी आहे.

Sushant Kulkarni