स्पेशल

घर घेण्याची योग्य वेळ कोणती? कमी वयात घर खरेदी केले तर काय होतात फायदे आणि तोटे? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

तरुणाई म्हटले म्हणजे कुठलीही गोष्ट अगदी पटकन करण्यामध्ये त्यांचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. अगदी शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरी लागली की लगेच आयुष्यात लागणाऱ्या काही गरजा पूर्ण करण्याच्या मागे तरुणाई मोठ्या प्रमाणावर असल्याचे आपल्याला दिसून येते.

यामध्ये बरेच तरुण-तरुणी हे घर आणि कार घेण्याचे स्वप्न बघायला लागतात व त्या स्वप्नपूर्तीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न देखील करतात. परंतु म्हणतात ना योग्य वेळेला योग्य गोष्ट करणे हे कधीही फायद्याचे असते. परंतु सध्या अगदी कमीत कमी वयामध्ये देखील तरुणांमध्ये घर खरेदी करण्याचे प्रमाण वाढल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

त्यामुळे साहजिकच घरांची मागणी वाढली असून त्याचा परिणाम हा घरांच्या किमती वाढल्यावर झाल्याचे आपल्याला दिसून येते. मागे झालेल्या एका सर्वेक्षणानुसार जर बघितले तर एकूण घरांच्या झालेल्या विक्रीमध्ये तब्बल 40% घरांची खरेदी तरुणांनी केल्याचे समोर आले आहे.

परंतु यामध्ये बरेच तरुण घर खरेदी करण्यासाठी योग्य वय कोणते याबाबत गोंधळात असल्याचे देखील दिसून येतात.यासाठी आपण या लेखामध्ये कमी वयात कर खरेदी करण्याचे फायदे आणि तोटे बघणार आहोत.

 कमी वयात घर खरेदी करण्याचे हे आहेत फायदे

कमी वयामध्ये जर तुम्ही घर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल व तसा बजेट तुमच्याकडे असेल तर त्याचे तुम्हाला अनेक फायदे देखील मिळतात. समजा तुमच्या करिअरला सुरुवात झाली व या सुरुवातीच्या कालावधीत तुम्ही घर खरेदी करत असाल तर निवृत्त होण्यापूर्वीच तुमच्या घराचं कर्ज तुम्ही परतफेड केलेलं असेल व पूर्ण कर्ज संपेपर्यंत तुमच्या घराची किंमत देखील अनेक पटींनी वाढलेली असेल.

अनेक तरुण हे भाडं भरण्याऐवजी घर खरेदी करून त्याची ईएमआय भरण्याला पसंती देतात व काही परिस्थितीमध्ये हा निर्णय खूप योग्य ठरतो. तसेच तुम्ही कमी वयामध्ये घराची खरेदी केलेली असेल तर प्रत्येक वर्षी करामध्ये देखील तुमची बचत होऊ शकते.

तसेच भाड्याच्या घरामध्ये राहताना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो त्या अडचणी स्वतःच्या घरामध्ये आपल्याला सहन कराव्या लागत नाही. भाड्याच्या घरामध्ये राहण्यात दरवर्षी घर बदलणे तसेच नवीन घर शोधणे इत्यादी प्रकारच्या समस्या आपल्याला दिसून येतात.

 कमी वयात घर खरेदी करण्याचे तोटे

अनेक जण कमी वयातच घर खरेदी करण्याचा निर्णय घेतात. आयुष्यामध्ये आपण जे काही उत्पन्न मिळवतो ते स्थिर राहील किंवा काही टक्क्यांनी त्यामध्ये वाढ होत राहील याचा एक अंदाज बांधून घर खरेदीचा निर्णय घेतला जातो. परंतु कधी कधी नोकरीमध्ये अडचणी येतात किंवा काही काळासाठी नोकरी जाते व यामुळे  संपूर्ण आर्थिक प्लॅनिंग विस्कटते व हप्ते भरणे देखील कठीण होते.

या परिस्थितीमध्ये तुमचे घराच्या ईएमआय भरला गेला नाही तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर होऊन तो खराब होऊ शकतो. तसेच तुम्ही जास्त कालावधीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरले नाहीत तर बँक तुमच्या घराचा लिलाव देखील करू एकते व तसा अधिकार बँकेला असतो.

दुसरी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे बऱ्याचदा नोकरीच्या साठी इतर ठिकाणी ट्रान्सफर होते व ट्रान्सफर झाल्याच्या ठिकाणी आपण भाड्याच्या घरात राहतो.

अशा परिस्थितीत घराचे भाडे आणि स्वतःच्या घराचा हप्ता हप्ते भरावे लागतात व त्यामुळे आपली आर्थिक घडी विस्कटू शकते. तुम्ही भविष्याकरिता  फायनान्शिअल प्लॅनिंग योग्य प्रमाणे केलं नसेल तर तुमच्यावर लोनचा ताण निर्माण होऊ शकतो.

 अशा प्रकारे योग्य नियोजन करणे गरजेचे

तुम्हाला जर कमी वयामध्ये किंवा नोकरी लागल्याच्या अगदी सुरुवातीला घर खरेदी करायचे असेल तर यामध्ये फायदे होऊ शकतात. योग्य ती प्लॅनिंग करून हा निर्णय घेणे गरजेचे ठरते. नोकरी झाल्यानंतर लगेचच घर खरेदी न करता त्याकरता तीन ते चार वर्षाचा कालावधी जाऊ देणे गरजेचे आहे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुमचे नोकरीचे शहर आणि राहण्याचे ठिकाण देखील ठरवणे महत्त्वाचे आहे. भविष्यामध्ये जर नोकरी बदलण्याची वेळ आली तर त्यानुसार तुम्हाला घर कुठे खरेदी करावं याचा निर्णय घेणे गरजेचे राहील. तसेच भविष्यामध्ये तुम्हाला येऊ शकणाऱ्या इतर खर्चाचा अंदाज घेऊनच फायनान्शिअल प्लॅनिंग करणे गरजेचे आहे.

यामध्ये घराचं डाऊन पेमेंट भरून त्यानंतर येणारा महिन्याचा ईएमआय भरून तुम्हाला खर्चासाठी बचत करणे देखील गरजेचे ठरते व त्यानुसार प्लॅनिंग करणे महत्त्वाचे राहील.

समजा तुम्ही विवाह अगोदर घर खरेदी करत असाल तर मात्र लग्नासाठी येणारा खर्च तसेच त्यानंतर मुलांचा व कुटुंबातील मेडिकल इमर्जन्सी साठी लागणारा खर्च याचा अंदाज घेऊन बचत करणे देखील तितकेच गरजेचे राहिल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच आर्थिक नियोजन करून घर खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil