स्पेशल

Aviation Fuel Price : विमानात कुठलं इंधन वापरतेत रे भाऊ ? ते किती रुपये लीटरने मिळत ? वाचून थक्क व्हाल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Aviation Fuel Price :- विमान हे तुम्हा आम्हांसाठी एक अप्रूप. लहानपण आठवतय का? आकाशात विमानाचा आवाज आला तरी त्याला गावाबाहेर जाईपर्यंत त्याच्यामागे पळायचो. यात प्रवास करणे हे लोकांसाठी अगदी स्वप्नासारखे. पण आज विमान प्रवास सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे.

अनेक लोक विमानाने प्रवासही करतात. विमानाने प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण हे विमान कोणत्या इंधनावर चालते हे अनेकांना माहित नसते. विमानात पेट्रोल किंवा डिझेल लागत नाही. मग कोणत्या प्रकारच्या इंधनाची आवश्यकता असते? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची किंमत किती असते? चला जाणून घेऊयात या अशा अनेक प्रश्नाची उत्तरे –

विमानात इंधन नेमकं कोणतं वापरतात ?
विमानाच्या इंधनाचा विचार केला तर यात दोन प्रकारचे इंधन वापरले जाते. एक असते AVGAS इंधन. हे लहान विमानात वापरले जाते. दुसरे आहे जेट इंधन किंवा रॉकेल. जेट ए1 आणि जेट ए अशा दोन प्रकारची अर्थात नावाची दोन जेट इंधने उपलब्ध आहेत.

जाणून घ्या जेट इंधनाची किंमत?
विमानाला लागणारे इंधन किलोलिटरमध्ये विकतात. एव्हिएशन टर्बाइन इंधनाची किंमत जवळपास सव्वा लाख रुपये प्रति किलोलिटर आहे. शहरानुसार त्याची किंमत वेगवेगळी असते. दिल्लीत ते 1 लाख 12 हजार रुपयांना उपलब्ध आहे, तर मुंबईत ते 1 लाख 11 हजार रुपये प्रति किलोलिटरने विकले जात आहे.

एक सेकंद उडण्यासाठी किती इंधन लागेल ?
बोईंग एअरलाइन्सच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, बोइंग 747 या विमानाला प्रति सेकंद 1 गॅलन (4 लीटर) इंधन लागते. 10 तास उड्डाण करण्यासाठी किमान 1.50 लाख लिटर इंधन लागेल. अर्थात 12 लिटर मध्ये 1 किमीमध्ये उडू शकते. एखादे विमान किती इंधन घेईल हे त्याची शक्ती, वेग आणि इतर गोष्टींवर अवलंबून असते.

अहमदनगर लाईव्ह 24