स्पेशल

तुम्ही कोणते दूध पिता? कच्चे की पाश्चराईज्ड? आरोग्यासाठी कोणते आहे फायदेशीर? वाचा काय म्हणतात तज्ञ?

Published by
Ajay Patil

Health Benefit Of Milk:- दूध हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असून सुदृढ शरीरासाठी व उत्तम आरोग्याकरिता दुधाचे सेवन हे फायदेशीर समजले जाते व त्यामुळे बरेच व्यक्ती दुधाचे सेवन करतात. दुधामध्ये प्रामुख्याने म्हैस तसेच गायीच्या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

साधारणपणे आपल्या घरी जे काही दूध येते ते गरम करून नंतर त्याचा वापर केला जातो किंवा ते पिण्यासाठी वापरले जाते. या अनुषंगाने जर आपण बघितले तर आरोग्यासाठी नेमके कच्चे दूध प्यावे की पाश्चराईज केलेले दूध? याबाबत बऱ्याच जणांना माहिती नसते किंवा याबाबत गोंधळ उडतो.

त्यामुळे या लेखात आपण दोन्हीपैकी कोणते दूध आरोग्याला फायदेशीर ठरू शकते? याबाबत तज्ञाचे मत काय आहे? याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती बघू.

कच्चे दूध पिण्याचे फायदे/ तोटे
कच्चे दूध म्हणजे गाई किंवा शेळ्या तसेच म्हैस इत्यादींचे दूध की ज्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसते त्याला म्हटले जाते. अशा प्रकारच्या दुधामध्ये प्रथिने तसेच चरबी, कॅल्शियम व खनिजे भरपूर प्रमाणामध्ये असतात व त्यामध्ये फायदेशीर अशी एंजाइम्स व प्रोबायोटिक्स देखील असतात असे तज्ञ म्हणतात.

कच्चे दूध हे पाश्चराईज्ड केलेल्या दुधापेक्षा अधिक समृद्ध तसेच मलाईदार व चवदार असते. तसेच कच्च्या दुधामध्ये लॅक्टोज सारखे एंजाइम्स असतात व जे लॅक्टोज पचनाला मदत करतात व त्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स देखील असतात. तज्ञांच्या मते कच्च्या दुधामुळे आरोग्याच्या बाबतीत काही धोके होऊ शकतात.

कच्च्या दुधात साल्मोनेला, ई. कोलाय व लिस्टेरिया यासारखे रोगजनक जिवाणूंचा समावेश होतो व त्यामुळे शरीराला काही अपाय होऊ शकतात. अशा प्रकारच्या जिवाणूमुळे काही आजार होऊ शकतात व जे गंभीर किंवा जीवघेणे देखील असू शकतात.

विशेषतः गर्भवती महिला तसेच लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्यांना होणाऱ्या कच्च्या दुधाचे संबंधित आजारांच्या लक्षणांमुळे मळमळ किंवा उलट्या, जुलाब व पोटदुखी इत्यादींचा समावेश यामध्ये असू शकतो.

पाश्चराईज्ड दूधाचे फायदे आणि तोटे
या प्रकारच्या दुधामध्ये दुधातील जिवाणू नष्ट व्हावेत याकरिता ते गरम केले जाते. परंतु गरम करत असताना मात्र दुधाची जी काही मूळ चव असते आणि त्यातील पोषक घटक असतात ते टिकवून ठेवले जातात.

पाश्चराईज्ड केलेल्या दुधामुळे त्यात असलेल्या हानिकारक जिवाणूंचा नाश होतो व ते दूध विटामिन बी सारख्या काही उष्मा संवेदनशील पोषक घटकांची पातळी देखील कमी करू शकतात. पाश्चराईज दूध हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा चांगला स्त्रोत असल्याचे देखील तज्ञ म्हणतात.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर पाश्चराईज्ड केलेल्या दुधामध्ये पॅथोजेनिक सूक्ष्मजीव नष्ट केले जातात. त्यामुळे जिवाणूमुळे होणारे इतर अन्नजन्य आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

दोघांपैकी कोणते दूध वापरावे?
कच्चे दूध चवीला चांगले असले तरी देखील मात्र त्यात शरीराला हानिकारक असे जिवाणू असू शकतात व त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तापवलेले दूध अधिक सुरक्षित आणि अधिक परवडणारे असते. या दृष्टिकोनातून पाश्चराईज्ड दुधाचा वापर करावा असे तज्ञ सांगतात.

Ajay Patil