स्पेशल

गव्हाच्या ‘या’ नवीन जातीपासून शेतकऱ्यांना मिळणारी एकरी 97 क्विंटल पर्यंतचे उत्पादन !

Published by
Tejas B Shelar

Wheat Farming : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाच्या पेरणीला वेग आला आहे. अनेक भागांमध्ये रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत तर काही ठिकाणी येत्या काही दिवसांनी पेरणीची कामे पूर्ण होणार आहेत.

रब्बी हंगामातील गहू या पिकाबाबत बोलायचं झालं तर याची लागवड महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये होते. भारत हा एक प्रमुख गहू उत्पादक देश आहे. गेल्या वर्षी आपल्या देशात गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती.

यंदाही देशात गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांश शेतकरी प्रामुख्याने रब्बी हंगामात गव्हाची लागवड करण्यास प्राधान्य देतात.

परंतु, शेतकऱ्यांनी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, सुधारित बियाण्यांमुळे ते पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन निश्चितच सुधारू शकतात. बंपर उत्पादनासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या गव्हाच्या जातीची गरज असते.

सध्या, शास्त्रज्ञांनी गव्हाचे असे वाण विकसित केले आहेत, जे प्रति हेक्टर 96-97 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यास सक्षम आहेत. दरम्यान, आता आपण गव्हाच्या अशाच एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गव्हाच्या या जातीपासून मिळणार विक्रमी उत्पादन

करण वंदना : करण वंदना ही गव्हाची एक सुधारित जात आहे. याला DBW 187 असेही म्हणतात. ही जात ICAR-Indian Wheat and Barley Research Institute, Karnal ने विकसित केली आहे. या जातीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, एका हेक्टरमध्ये सुमारे 96.6 क्विंटल उत्पादन मिळू शकते. या जातीच्या गव्हावर पिवळा तांबेरा, ब्लास्ट यांसारखे रोग होण्याची शक्यता फारच कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पंजाब, दिल्ली आणि जम्मू येथील शेतकऱ्यांसाठी ही जात उपयुक्त असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. करण वंदना जातीचे पीक १४८ दिवसांत तयार होते. या जातीचा गहू ब्रेड बनवण्यासाठी सर्वोत्कृष्ट असतो.

करण श्रिया : करण श्रिया ही देखील गव्हाची एक सुधारित जात आहे. या जातीला DBW 252 या नावाने ओळखले जाते. जून 2021 मध्ये हा वाण शेतकऱ्यांसाठी लाँच करण्यात आली होती. जे ICAR-Indian Wheat and Barley Research Institute, Karnal ने विकसित केले आहे.

करण श्रीया ही जात केवळ एका पाण्यावर तयार होऊ शकते. या वाणापासून एक हेक्टरमध्ये सुमारे 55 क्विंटल उत्पादन घेता येते. करण श्रिया हा प्रकार १२७ दिवसांत तयार होतो. ही जात पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ईशान्येकडील तराई भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com