कमीत कमी किमतीत चांगल्या कंपनीची आणि महत्वपूर्ण आणि दमदार फीचर्स असलेली कार जर तुम्हाला या सणासुदीच्या कालावधीमध्ये विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला जास्त पर्याय शोधण्याची गरज नाही. कारण भारतीय कार बाजारपेठेतील अग्रगण्य आणि नामांकित असलेली मारुती सुझुकी या कंपनीने त्यांची प्रसिद्ध असलेली हॅचबॅक कार वॅगनारची नवीन एडिशन वॉल्टज नुकतीच लॉन्च केलेली आहे.
कंपनीने या कारमध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स दिले असून मारुती सुझुकीच्या बाकीच्या कार मॉडेल्सपेक्षा ही कार हटके बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला स्पोर्टी लूक असलेली आणि फॅमिली साठी जर कार विकत घ्यायची असेल तर तुमच्यासाठी मारुती वॅगनार वॉल्टज ही कार खूप फायद्याचे ठरू शकते.
या कारला खूप आकर्षक असा लूक देण्यात आला असून इंजिन देखील पावरफुल आहे. त्यामुळे या सणासुदीत फॅमिलीसाठी कार घ्यायची असेल तर तुमच्यासाठी वॅगनार वॉल्टज हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कंपनीने ही कार VXi, LXi आणि ZXi या तीन व्हेरियंट्समध्ये सादर केली आहे.
या कारमध्ये काय देण्यात आले आहेत अपडेट्स?
कंपनीने या कारमध्ये फॉग लॅम्पस, विल आर्क क्लेडिंग, बंपर प्रोटेक्टर्स, साईड स्कर्टस, बॉडी साइड मोल्डिंग, नवीन फ्लोअर मॅट्स, इंटिरियर स्टाइलिंग किट्स आणि फ्रंट क्रोम ग्रील इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आलेला असून या सगळ्यांमुळे या कारला स्पोर्टी लुक मिळताना आपल्याला दिसून येतो.
इतकेच नाहीतर या कारमध्ये 6.2 इंच टचस्क्रीन म्युझिक सिस्टम, स्पीकर्स तसेच सुरक्षा व्यवस्था आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा सारख्या महत्त्वपूर्ण सोयी देखील देण्यात आले आहेत.
किती आहे या कारचे मायलेज?
कंपनीने ही कार 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.0 लिटर पेट्रोल इंजिन पर्यायसह वॅगनार वॉल्टज एडिशन सादर केली असून हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ही कार तुम्हाला सीएनजी व्हेरियंटमध्ये देखील खरेदी करता येऊ शकते. मायलेज बद्दल जर आपण मारुती सुझुकी कंपनीचा दावा बघितला तर त्यानुसार पेट्रोल व्हेरिएंट 25.19 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते तर सीएनजी व्हेरियंट 33.48 किलोमीटर प्रति किलो इतके मायलेज देते.
सुरक्षिततेबाबत काय वैशिष्ट्य आहेत?
या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन म्हणजेच ईबीडी इत्यादी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. तसेच ड्युअल एअरबॅग, रेअर पार्किंग सेन्सर व स्पीड लिमिट अलर्ट इत्यादींचा समावेश आहे.
किती आहे या कारची किंमत?
मारुती सुझुकीच्या वेगनर वॉल्टज कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5 लाख 65 हजार रुपये इतकी आहे.