Numerology:- अंकशास्त्र हे एक महत्त्वाचे शास्त्र असून यामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेवरून संबंधित व्यक्तीचे भविष्य तसेच त्याचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव कसा असतो? या व इतर अनेक बाबतीत माहिती सांगितली जाते. आपल्याला माहित आहे की जन्म तारखे वरून मुलांक काढला जातो व या मुलांकावरून व्यक्तीच्या जीवनाविषयीचे भविष्य किंवा माहिती दिली जाते.
याचसोबत जर अंकशास्त्रानुसार आपण बघितले तर व्यक्तीची जन्मतारीख आणि त्या जन्मतारखेवरून येणारा त्या व्यक्तीचा मूल्यांक हा लग्नाविषयी फार महत्त्वाचा असतो.म्हणजे कोणत्या जन्म तारखेच्या लोकांना लग्नासाठी कोणत्या जन्मतारखा या लकी ठरतात याची देखील माहिती अंकशास्त्रामध्ये दिलेली आहे. याविषयीचीच माहिती आपण थोडक्यात बघू.
कोणत्या जन्मतारखेच्या लोकांना लग्नासाठी कोणत्या कोणत्या जन्म तारखा लकी असतात?
1- जन्मतारीख 1,10,19 किंवा 28( मुलांक एक)- कोणत्याही महिन्यातल्या एक, 10, 19 किंवा 28 तारखेला ज्या व्यक्तींचा जन्म झालेला असतो त्यांचा मूलांक एक असतो. अंकशास्त्रानुसार बघितले तर या मुलांकांच्या व्यक्तींचा विवाह दोन,
चार आणि सहा या मूल्यांकाच्या व्यक्तीशी झाला तर तो फायदेशीर ठरतो. या मुलांकाचे जोडीदार एक मुलाकांच्या व्यक्तीसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे अंकशास्त्रानुसार बघितले तर मूल्यांक एक असलेल्या व्यक्तींनी दिलेल्या या मुलांकांच्या व्यक्तींची विवाह करावा.
2- जन्मतारीख दोन, अकरा किंवा वीस तारीख( मुलांक 2)- या जन्म तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असतो त्यांचा मूलांक दोन असतो. स्वभावाला या व्यक्ती खूप मुडी असतात व स्वतःच्या मनाप्रमाणे वागत असतात. सहसा हे व्यक्ती लव मॅरेज करतात. या व्यक्तींसाठी मुलांक एक, तीन आणि सहा असलेला जोडीदार खूप चांगला ठरतो.
3- जन्मतारीख 12, 3,21,30- कोणत्याही महिन्याच्या या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक तीन असतो. आयुष्यामध्ये हे व्यक्ती फार रोमँटिक असतात.
या व्यक्तींसाठी 2,6 किंवा नऊ मुलांक असलेले जोडीदार योग्य ठरतात. या मुलांकाच्या व्यक्तींशी जर त्यांचा विवाह झाला तर जीवनातील अनेक समस्या मिटतात.
4- जन्मतारीख 4,13,22 किंवा 31- कोणत्याही महिन्याच्या या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 4 असतो. हे व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तींशी नातेसंबंधात असतात.
अंकशास्त्रानुसार आपण बघितले तर व्यक्तीची जन्मतारीख आणि त्या जन्मतारखेवरून येणारा त्या व्यक्तीचा मूल्यांक हा लग्नाविषयी फार महत्त्वाचा असतो.म्हणजे कोणत्या जन्म तारखेच्या लोकांना लग्नासाठी कोणत्या जन्मतारखा या लकी ठरतात याची देखील माहिती अंकशास्त्रामध्ये दिलेली आहे. या व्यक्तींच्या एक दुर्गुण म्हणजे यांनी लव मॅरेज केले तरीदेखील ते लग्नानंतर विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांच्यावर लग्न मोडण्याची वेळ येऊ शकते. या व्यक्तींसाठी एक, 2,7 किंवा आठ मुलांक असलेले व्यक्ती जोडीदार म्हणून चांगले ठरतात.
5- जन्मतारीख 5, 14,23- कोणत्याही महिन्याच्या या तारखांना जन्म झालेल्या व्यक्तींचा मुलांक पाच असतो. या व्यक्तींना जर प्रेमविवाह करायचा असेल तर ते अगोदर कुटुंबाची सहमती घेतात. पाच आणि आठ मुलांक असलेले व्यक्ती एकमेकांचे चांगले जोडीदार ठरतात.
6- जन्मतारीख 6,15,24- कोणत्याही महिन्याच्या या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक सहा असतो. या तारखांना जन्मलेले व्यक्ती खूप आकर्षक असतात व त्यामुळे लोक त्यांच्याकडे पटकन आकर्षित होतात. साधारणपणे या मुलांकाच्या व्यक्तींचे सर्वांशी चांगले पटते व त्यामुळे कोणताही मूलांक असलेल्या व्यक्तींशी विवाह केला तरी चांगले ठरते.
7- जन्मतारीख 7,25,16- कोणत्याही महिन्याच्या या तारखांना जन्म झालेल्या व्यक्तींचा मुलांक सात असतो. हे व्यक्ती खूप तत्त्वज्ञानी असतात व दृढनिश्चयी देखील असतात. सात मुलांक असलेल्या व्यक्तींनी एक किंवा आठ मुलांक असलेल्या व्यक्तींशी विवाह करावा.
8- जन्मतारीख 8,17,26- कोणत्याही महिन्याच्या या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मुलांक आठ असतो व या मुलांकाच्या व्यक्तींनी दोन, तीन, पाच आणि सहा या मुलांकांच्या व्यक्तींची विवाह करावा.
9- जन्मतारीख 9, 18,27- कोणत्याही महिन्याच्या या तारखांना जन्म झालेल्या लोकांचा मूल्यांक 9 असतो व या लोकांचे लव लाइफ खूपच सामान्य स्वरूपाचे असते. या मुलांकांच्या व्यक्तींनी 1,3,5 आणि सहा मुलांकांच्या व्यक्तीशी विवाह करावा.
मुलांक कसा काढला जातो?
जन्मतारखेच्या अंकांची बेरीज करून प्रामुख्याने मुलांक काढला जातो. उदाहरणच घ्यायचे झाले तर 27 या तारखेला जन्म झालेल्या लोकांचा मुलांक हा 2+7=9असतो.