आपण जेव्हा कुठलेही वाहन वापरतो तेव्हा त्या वाहनामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची समस्या निर्माण होत असते. अशा प्रकारची जर समस्या निर्माण झाली तर आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसल्याकारणाने आपल्याला दुरुस्तीकरिता मेकॅनिककडे जावे लागते. मेकॅनिककडे गेल्यावर मात्र आपल्या खिशाला पैशाच्या बाबतीत झटका बसतोच आणि वेळ देखील वाया जातो. ही गोष्ट बाईक आणि कार बद्दल आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
तसेच कारने जर प्रवास करत असाल तर अशा अनेक छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स निर्माण होतात. ते सोडवणे खूप सोपे असते परंतु त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्या कारणाने आपल्याला मेकॅनिककडे जाण्याची गरज भासते. त्यामुळे या लेखामध्ये आपण कारबद्दल असे काही छोटे प्रॉब्लेम बघणार आहोत जे तुम्ही मेकॅनिक कडे न जाता ते सहजपणे मिनिटांमध्ये तुम्ही स्वतः सोडवू शकतात.
कारमधील हे छोटे-मोठे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सोडवू शकतात
1) बोनेट बंद केल्यानंतर राहणारा गॅप
बऱ्याचदा काही कारणामुळे आपण कारचे बोनेट उघडतो व ते नंतर बंद करतो. परंतु अशा वेळेस बोनेट बंद केल्यानंतर त्यामध्ये गॅप राहताना आपल्याला दिसून येतो. बरेच प्रयत्न करून देखील तो गॅप क्लिअर होत नाही. अशा परिस्थितीमध्ये कारचे बोनेट उघडावे व बाजूला असणारे जे काळ्या रंगाचे सर्व स्क्रू असतात ते व्यवस्थित फिट आहेत की नाही याची व्यवस्थित खातरजमा करून घ्यावी. कारण बऱ्याचदा हे स्क्रू व्यवस्थित फिट नसतील व ते ढीले झाले असतील तर बोनेट बंद केल्यानंतर गॅप राहतो. अशावेळी हे स्क्रू फिट केल्यानंतर ही समस्या दूर होते.
2) कारची टचस्क्रीन हँग झाली
ज्याप्रमाणे बरेचदा पण मोबाईल वापरत असताना तो हँग होतो व सहसा व्यवस्थितरित्या काम करत नाही. त्यामुळे आपण मोबाईल रिस्टार्ट करतो व त्यानंतर मात्र हँग झालेला मोबाईल पूर्ववत काम करायला लागतो. परंतु कारमध्ये असणारी जर टचस्क्रीन हँग झाली तर मात्र काय करावे हे आपल्याला कळत नाही. तसे पाहायला गेले तर ही समस्या फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्ही सोडवू शकतात. काही कारमधील टचस्क्रीन हँग झाली तर ही समस्या सोडवण्यासाठी टचस्क्रीन जवळ असलेली मेनू बटन आणि पावर बटन एकाच वेळी दाबावे. असे केल्यामुळे दोन मिनिटात टचस्क्रीन पुन्हा रिस्टार्ट होते व ती व्यवस्थित काम करायला लागते.
3) इंधन टाकीचे झाकण उघडत नसेल
बरेचदा आपण पेट्रोल पंपावर जेव्हा पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी जातो तेव्हा फ्युएल टाकीचे झाकण उघडत नाही. अशावेळी आपण बऱ्याचदा ते झाकण बाहेरून उघडण्याचा प्रयत्न करून पाहतो. परंतु असे केल्यामुळे बऱ्याचदा कारचा पेंटला इजा पोहचून तो खराब होण्याची शक्यता असते. परंतु अशा परिस्थितीमध्ये झाकण उघडायचे असेल तर अगोदर कारची डिक्की उघडावी. त्यामध्ये फ्युएल टाकीचे झाकण उघडण्यासाठी त्या ठिकाणी एक काळी तार दिसेल व ही तार जर तुम्ही ओढली तर लगेच फ्युएल टाकीचे झाकण आरामात उघडते.
अशाप्रकारे इतर अनेक गोष्टी तुम्ही जर शिकून घेतल्या तर तुम्हाला प्रवासामध्ये नक्कीच फायदा होतो आणि अनेक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मेकॅनिकीकडे जायची गरज राहत नाही.