स्पेशल

प्रत्येक वर्षाला कार विम्यावर कशाला करतात हजारोंचा खर्च? फक्त ‘या’ गोष्टी करा आणि कार विम्याचे पैसे वाचवा !

Published by
Ahmednagarlive24 Office

ज्याप्रमाणे व्यक्तीकरिता विमा ही एक आवश्यक गोष्ट आहे. अगदी त्याचप्रमाणे वाहनांसाठी देखील विमा हा खूप महत्त्वाचा असतो. कारण म्हटले जाते की वाहन हे रस्त्यावर चालते आणि कोणत्या वेळेस काय होईल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नसल्याने वाहनांचा विमा उतरवणे ही काळाची गरज आहे. साधारणपणे प्रत्येक व्यक्ती त्याच्या वाहनाचा विमा उतरवतो. आपल्या भारतामध्ये सध्या चारचाकी वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे व त्यासोबत कारसाठी विमा घेणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झालेली आहे.

तसेच आपण मोटर वाहन अधिनियम पाहिला तर त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी जी वाहने धावतात त्या गाडीचा विमा असणे गरजेचे असते. आपल्याला माहित आहे की कार चोरीला गेली किंवा काही अपघात झाला किंवा इतर कोणत्या कारणामुळे कारचे किंवा वाहनाचे काही नुकसान झाले तर तुम्हाला, विमा असल्यास भरपाई मिळू शकते.

परंतु जर आपण भारतीय नागरिकांचा विचार केला तर निव्वळ कार विम्यावर प्रत्येक वर्षाला हजारो रुपयांचा खर्च होतो. साधारणपणे कार विम्यावर वर्षाला पाच हजार रुपयांपासून ते 25 हजार रुपये पर्यंत भारतीय नागरिक खर्च करतो. परंतु हा खर्च जर तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्ही काही गोष्टींचा वापर करून कार विम्याची रक्कम कमी करू शकता व कमीत कमी रकमेत चांगला विमा घेऊ शकतात.

कार विम्याची रक्कम कशी निश्चित केली जाते?

आपण जेव्हा कार विमा घ्यायला जातो तेव्हा त्याच्यासाठी भरावी लागणारी रक्कम ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जसे की, कारचा प्रकार कोणता आहे किंवा त्यातील इंजिन कसे आहे? या गोष्टींवर विम्याची रक्कम ठरत असते. तसेच कार किती जुनी आहे व गाडी मालकाचे वय किती आहे तसेच चालकाचा गाडी चालवण्याचा रेकॉर्ड कसा आहे? कारचे इंजिन सीएनजी आहे की डिझेल? इत्यादी सर्व गोष्टी पाहून विम्याची रक्कम ठरवली जाते. तसेच विम्याचा कोणता प्रकार निवडता आहात किंवा कोणत्या शहरात राहतात यावर देखील हे अवलंबून असते.

या टिप्स फॉलो करा आणि कार विम्याची रक्कम कमी करा

लॉन्ग टर्म विमा घ्या परंतु ही गोष्ट करा –

जेव्हा आपण नवीन वाहन घेतो तेव्हा जास्त मुदतीचा म्हणजे लॉन्ग टर्म थर्ड पार्टी विमा घेत असतो व तो आवश्यक देखील असतो. परंतु लॉन्ग टर्म मध्ये रक्कम ही जास्त असण्याची शक्यता असते. या परिस्थितीमध्ये तुम्ही लॉन्ग टर्म विमा घेताना त्यातील तुमच्यामुळे झालेले नुकसानीचा जो काही भाग असतो त्यासाठीचा विमा फक्त एक वर्षासाठी घेऊ शकतात व इतर नुकसानीसाठी लॉन्ग टर्म विमा घ्यावा. या ट्रिक्सने देखील विम्याची मूळ रक्कम कमी होते.

नो क्लेम बोनसचा वापर करावा –

आपण नुकसान झाली तर त्याची भरपाई मिळावी या उद्देशाने सर्वसाधारणपणे कार विमा काढत असतो. परंतु यामध्ये अगदी लहान लहान नुकसान झाले व त्याचे क्लेम केले तर भविष्यामध्ये याचा फायदा होण्याऐवजी तोटा होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या विम्याचे रिन्यूअल म्हणजेच नूतनीकरण करता तेव्हा नूतनीकरणाचा फायदा तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे अशा छोट्या छोट्या नुकसानीचा क्लेम जर तुम्ही केला नाही आणि वर्षभरात कोणताही क्लेम तुम्ही केला नाही तर अनेक विमा कंपन्या विमा नूतनीकरणाच्या वेळी पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देतात व विम्याची रक्कम थेट अर्धी होते.

विम्याची मुदत संपण्याआधी नूतनीकरण करणे गरजेचे –

तुम्ही कार विमा घेतला आहे व त्याची मुदत संपण्या अगोदर तुम्ही नूतनीकरण केले तर तुम्हाला याचा देखील फायदा मिळतो. विम्याची मुदत संपण्याआधी तुम्ही नूतनीकरण केल्यास तुम्हाला डिस्काउंट आणि नूतनीकरणाचा देखील फायदा मिळतो. परंतु मुदत संपल्यानंतर जर तुम्ही विमा काढला तर कोणत्याही डिस्काउंटचा लाभ तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे मुदत संपण्याआधी नूतनीकरण केल्यास डिस्काउंटचा फायदा मिळून तुमची मूळ विमा रक्कम कमी होते.

कारचे नुकसान झाल्यास आधी स्वतः खर्च करण्याची तयारी ठेवली तर मिळतो फायदा –

जेव्हा तुम्ही विमा काढतात व त्यानंतर कारचे नुकसान झाल्यास त्यामध्ये सुरुवातीला जर स्वतः खर्च करण्याची तयारी तुम्ही ठेवणे गरजेचे असते. विम्याच्या या अटीमध्ये तुम्हाला आधी खर्च तुम्हाला करावा लागतो व त्यानंतर विमा कंपनी क्लेमची रक्कम तुम्हाला देते. या पद्धतीने तुम्ही वजावटीची निवड केली तर कंपनी विमा काढताना तुम्हाला डिस्काउंट देते. या वजावटीची निवडीची अट जर तुम्ही मान्य केली तर कारचे जास्त नुकसान झाल्यास देखील तुम्हाला सुरुवातीला दुरुस्तीसाठी खर्च करावा लागतो व ती तयारी तुमच्याजवळ असायला हवी.

विम्यामध्ये कोणत्या गोष्टी कव्हर कराव्या हे तुम्ही ठरवा –

जेव्हा आपण कारचा विमा घेतो तेव्हा कंपन्यांच्या माध्यमातून यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश केलेला असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर यामध्ये झिरो डेफ्रिसेशनपासून ते इंजिनच्या कव्हरपर्यंत समावेश केलेला असतो. अशामुळे तुमच्या विम्याची मूळ रक्कम वाढते. यामध्ये तुम्ही येत असलेल्या विम्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा हे तुम्ही ठरवू शकतात. या माध्यमातून देखील तुम्ही मूळ विम्याची रक्कम कमी करू शकतात. यासोबतच कोणती कंपनी तुम्हाला कमीत कमी रकमेत चांगला विमा देत आहे हे देखील तपासून पाहणे गरजेचे आहे व तुलना करून निर्णय घ्यावा.

Ahmednagarlive24 Office