स्पेशल

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार ! महिलेच्या मानेला पकडत…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Breaking : बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना काल बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील निमगाव टेंभी परिसरात घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगीता शिवाजी वर्षे (वय ४३), असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

सदर महिला घराच्या बाहेर कपडे धुवत होती. जवळच असणाऱ्या गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक या महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली. निमगाव टेंभी शिवारातील जाखुरी रोड वरील वर्षे वस्तीवर ही घटना घडली.

बिबट्याने या महिलेच्या मानेला पकडत तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्याची माहिती समजताच सदर महिलेच्या दिराने तिला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याने महिलेच्या मानेला पकडून तिला गिन्नी गवतात ओढत नेले .

दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संगीता वरपे यांना नातेवाईकांनी तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील, वनक्षेत्रपाल सचिन लोंढे, वनपाल संगीता कोंढार, वन परीक्षक मंडळ चैतन्य कासार हे रुग्णालयात आले. यावेळी नातेवाईकांनी संताप व्यक्त केला

अहमदनगर लाईव्ह 24